नवी दिल्ली, 08 जून: गेल्यावर्षीपेक्षा स्वस्त दरात सोनं-चांदी खरेदी (Gold Silver Price) करण्याची सध्या संधी आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर कमी होत आहेत. मंगळवारी एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange MCX) सोन्याचे भाव (Gold Price Today) उतरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झाल्याने सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. मंगळवारी एक्सचेंज उघडल्यानंतर ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या सोन्याची वायदे किंमत 43 रुपयांनी कमी होत 49,100 रुपये प्रति तोळा झाली आहे. तर ऑक्टोबर डिलिव्हरीच्या सोन्याचे दर देखील 49403 रुपयांवर आहेत. चांदीचे दर देखील कमी झाले आहेत.
रेकॉर्ड स्तरावरुन सोन्याचे दर 7000 रुपयांनी कमी
स्थिर ग्लोबर रेट्स असताना भारतात सोन्याचांदीच्या दरात घसरण पाहायला मिळते आहे. आधीच्या सत्रात एमसीएक्सवर सोन्याचे दर घसरणीनंतर 49,131 रुपये प्रति तोळा होते. तर चांदीचे र 0.3 टक्क्यांनी कमी होत 71,619 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. तज्ज्ञांच्या मते देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर सध्या 49550-49750 या स्तरावर राहतील. गेल्या आठवड्यात महागाईच्या अंदाजामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर पाच महिन्यातील सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. यावेळी दर साधारण 49700 रुपये प्रति तोळाच्या आसपास होते. दरम्यान असं असलं तरीही हा भाव गेल्यावर्षीच्या सर्वोच्च स्तरापेक्षा जवळपास 7000 रुपयांनी कमी आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते.
हे वाचा-PNB आणि BOI च्या ग्राहकांनी लक्ष द्या! या 2 बँकांना RBI ने ठोठावला 6 कोटींचा दंड
सोन्यांचांदीचे दर
एचडीएफसी सिक्योरिटीजच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात घसरणीमुळे सोमवारी दिल्लीमध्ये सोन्यामध्ये घसरण पाहायला मिळाली. 152 रुपयांच्या घसरणीनंतर याठिकाणी सोन्याचे दर प्रति तोळा 48,107 रुपयांवर पोहोचले होते. चांदीचे दर देखील 540 रुपयांनी कमी होऊन 69,925 रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,883 डॉलर प्रति औंस आणि चांदीचा भाव 27.55 डॉलर प्रति औंस होता.
हे वाचा-खूशखबर! मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक मिळतील 42000, वाचा कसा होईल फायदा
देशातील प्रमुख शहरातील सोन्याचांदीचे भाव
गुड रिटर्न वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा दर 4,851 प्रति ग्रॅम, 38,808 रुपये प्रति 8 ग्रॅम, 48,510 रुपये प्रति तोळा आणि 4,85,100 रुपये प्रति 100 ग्रॅम आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 47,510 आहे. तर आजचा चांदीचा भाव प्रति किलो 71,000 रुपये आहे.
-दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,950 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 52,300 रुपये प्रति तोळा आहे
-मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,510 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 48,510 रुपये प्रति तोळा आहे
-कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 48,030 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 50,730 रुपये प्रति तोळा आहे
-चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 46,050 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 50,240 रुपये प्रति तोळा आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.