मराठी बातम्या /बातम्या /मनी /

नोकरदारांसाठी मोठी बातमी! लवकरच वाढणार तुमचा PF, वाचा काय आहे सरकारचा प्लॅन

नोकरदारांसाठी मोठी बातमी! लवकरच वाढणार तुमचा PF, वाचा काय आहे सरकारचा प्लॅन

केंद्र सरकार लवकरच नवीन लेबर कोड (New labour code) लागू करणार आहे. नवीन लेबर कोड लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना मिळणारी इन-हँड सॅलरी कमी होणार आहे आणि पीएफ वाढणार आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 08 जून: नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही देखील जर नोकरी करत असाल तर लवकरच तुमच्या पीएफ खात्यात येणारी रक्कम वाढणार आहे, अर्थात सध्या तुमच्या पगारातून जेवढा पीएफ कापला जातो तो काही महिन्यात वाढण्याची शक्यता आहे.  केंद्र सरकार लवकरच नवीन लेबर कोड (New labour code) लागू करणार आहे. नवीन लेबर कोड लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना मिळणारी इन-हँड सॅलरी कमी होणार आहे आणि पीएफ वाढणार आहे. हा नियम 1 एप्रिलपासून लागू होणार होता, मात्र काही कारणांमुळे ते पुढे ढकलण्यात आले. दरम्यान येणाऱ्या दोन-तीन महिन्यात हा कोड लागू करण्याच्या विचारात सरकार आहे.

नवीन लेबर कोड लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये वाढ होणार आहे मात्र त्यांची टेक होम सॅलरी कमी होईल. यानंतर ग्रॅच्युइटी (gratuity) देखील वाढण्याची शक्यता आहे. मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार वेज कोड लागू झाल्यानंतर कर्मचाख्यांच्या बेसिक पे आणि प्रोव्हिडेंट फंड कॅलक्यूलेट करण्याच्या पद्धतीतही बदल होतील.

कोणते चार लेबर कोड होतील लागू?

सरकार चार लेबर कोड लागू करण्याबाबत विचार करत आहे. यामध्ये इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड, कोड ऑन ऑक्‍यूपेशनल सेफ्टी, हेल्‍थ अँड वर्किंग कंडीशन्स कोड (OSH) आणि सोशल सिक्‍योरिटी कोड ऑन वेजेज इत्यादींचा समावेश आहे.

हे वाचा-खूशखबर! मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक मिळतील 42000, वाचा कसा होईल फायदा

काय आहे न्यू वेज कोड?

वेज कोड अॅक्ट (Wage Code Act), 2019 च्या मते कोणतीही कंपनी कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी त्याच्या सीटीसी (Cost To Company-CTC) च्या 50 टक्क्यापेक्षा कमी ठेवू शकणार नाही. नवीन कोड लागू झाल्यानंतर तुमच्या सीटीसीच्या 50 टक्के बेसिक सॅलरीच्या स्वरुपात मिळतील. जर असं झालं तर प्रोव्हिडेंट फंड (Provident Fund) आणि ग्रॅच्युइटीमध्ये (Gratuity) तुमचं योगदान वाढेल.

हे वाचा-PNB आणि BOI च्या ग्राहकांनी लक्ष द्या! या 2 बँकांना RBI ने ठोठावला 6 कोटींचा दंड

पगारात केवळ तीन घटकांचा समावेश

नवीन कोडनुसार तुमच्या सॅलरीमध्ये केवळ तीन घटक समाविष्ट असतील. पहिला म्हणजे बेसिक पे, दुसरा डीए आणि तिसरा  retention payment कॉम्पोनंट असेल.

First published:

Tags: Money, Pf, PF Amount, Pf news