• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Good News : यंदा दिवाळीत अवघ्या 1 रुपयात खरेदी करा Digital Gold; जाणून घ्या ही सोपी पद्धत

Good News : यंदा दिवाळीत अवघ्या 1 रुपयात खरेदी करा Digital Gold; जाणून घ्या ही सोपी पद्धत

धनत्रयोदशीच्या (Dhanteras 2021) दिवशी सोनेखरेदी करणं शुभ मानलं जातं. तुम्हालाही सोनं खरेदी करायचं असेल, तर तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : दिवाळीला अवघे काही दिवस राहिले आहेत. दिवाळीच्या (Diwali 2021) मुहूर्तावर अनेक जण सोन्याची खरेदी करतात. धनत्रयोदशीच्या (Dhanteras 2021) दिवशी सोनेखरेदी करणं शुभ मानलं जातं. तुम्हालाही सोनं खरेदी करायचं असेल, तर तुमच्यासाठी डिजिटल गोल्ड (digital gold) चांगला पर्याय असू शकतो. तुम्ही Google Pay, Paytm, PhonePe सारख्या अनेक मोबाइल वॉलेट प्लॅटफॉर्मवर (Mobile wallet platform) फक्त 1 रुपयात सोने खरेदी करू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की डिजिटल सोनं म्हणजे काय. त्याबद्दल जाणून घेऊ या. डिजिटल सोन्याची खरेदी दुकानात जाऊन केल्या जाणाऱ्या खरेदीपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. सहसा ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली जाते आणि त्याचा वापरदेखील केला जातो; पण डिजिटल सोनेखरेदीत तसं होत नाही. डिजिटल सोन्याला स्पर्श करता येत नसला, तरी या सोन्याची शुद्धता किंवा सुरक्षेची हमी असते. गेल्या काही वर्षांत डिजिटल सोने गुंतवणुकीचं प्रमुख माध्यम म्हणून उदयास आलं आहे. डिजिटल पद्धतीने सोनेखरेदी करताना तुम्ही लहान रक्कम गुंतवू (Gold Investment) शकता. विशेष म्हणजे सोने डिजिटल स्वरूपात असल्यामुळे त्याच्या सुरक्षेची जोखीम राहत नाही. तसंच भविष्यात अडचणीच्या वेळी डिजिटल गोल्डच्या स्वरूपातलं हे सोनं विकून तुम्हाला झटपट पैसेही मिळवता येऊ शकतात. डिजिटल गोल्डचं वैशिष्ट्य म्हणजे, सोन्याच्या शुद्धतेची 100 टक्के हमी असते. कसे खरेदी करायचे डिजिटल गोल्ड? दिवाळीची वेळ साधून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘गुगल पे'ने (Google pay) खास ऑफर सुरू केली आहे. डिजिटल गोल्ड खरेदी करण्यासाठी गुगल पे या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मवर लॉगिन करावे लागेल. लॉगिन केल्यानंतर तिथे तुम्हाला खाली स्क्रोल करत जावं लागेल. गोल्ड आयकॉन या पर्यायावर क्लिक करायचं. यानंतर मॅनेज युवर मनी या पर्यायामध्ये गोल्ड बाय हा पर्याय दिसतो. तो निवडावा लागेल. येथे तुम्ही एक रुपयामध्येसुद्धा डिजिटल सोने खरेदी करू शकता. येथे 3% जीएसटी भरावा लागेल. जर तुम्ही या प्लॅटफॉर्मवर 5 रुपयांचे डिजिटल सोने खरेदी केले. तर तुम्हाला 0.9 mg मिळेल. डिजिटल गोल्ड खरेदी व्यतिरिक्त सोन्याची विक्री, डिलिव्हरी आणि गिफ्ट यांचा पर्यायही मिळतो. तुम्हाला सोनं कुणाला गिफ्ट करायचं असेल, तर गिफ्टचा पर्याय निवडावा लागतो. खरेदी केलेलं सोनं त्याचठिकाणी तुम्ही लगेच विकूदेखील शकता. तिथे सेल असा पर्याय असतो. हे ही वाचा-Gold Investment बाबत सेबीचं फर्मान, जारी केले नवे नियम पेटीएमवरसुद्धा (Paytm) तुम्ही सोनेखरेदी करू शकता. पेटीएम गोल्डवरून सोने खरेदी करण्यासाठी पेटीएम गोल्डच्या पर्यायावर क्लिक करा. तसेच फोनपे (PhonePe) वरून सोने खरेदी करण्यासाठी तुम्हाला मायमनी (Mymoney) वर क्लिक करावे लागेल. खरेदीबरोबरच इथे सोने तुम्ही विकूदेखील शकता. त्यामुळे सोनेरी संधी साधा आणि गुंतवणूक करून फायदा घ्या.
  First published: