Home /News /money /

Gold Price Today: आज उतरले सोन्याचे दर, सोनं रेकॉर्ड स्तरापेक्षा 7945 रुपयांनी स्वस्त

Gold Price Today: आज उतरले सोन्याचे दर, सोनं रेकॉर्ड स्तरापेक्षा 7945 रुपयांनी स्वस्त

Gold Price Today: आज सराफा बाजारात सोन्याचे आणि चांदीचे दर कमी झाले आहेत. त्यानंतर रेकॉर्ड स्तरापेक्षा मोठ्या फरकाने सोनं स्वस्त मिळत आहे.

    नवी दिल्ली, 16 जुलै: सोन्याचांदीची खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या किंमतीत (Gold Price Today) घसरण पाहायला मिळाली आहे. शिवाय चांदीचे दरही (Silver Rates) कमी झाले आहेत. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या (HDFC Securities) मते, आंतरराष्ट्रीय स्तरावर घसरण झाल्याने शुक्रवारी देशांतर्गत बाजारात सोन्याचे 73 रुपयांनी कमी झाले आहेत. यानंतर सोन्याचे दर 47,319 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. आज 16 जुलै रोजी एमसीएक्सवर ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर (Gold Rates) 22 रुपयांच्या घसरणीसह खुले झाले होते आणि त्यानंतर यामध्ये घसरण वाढत गेली. दुपारी तीन वाजता एमसीएक्सवर सोन्याचे दर 145 रुपयांनी कमी झाले होते. यानंतर याठिकाणी सोन्याचे दर 47,319 रुपये प्रति तोळा होते. शिवाय चांदीचे दर (Silver Price Today) 196 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत. या घसरणीनंतर चांदीचे दर 68,043 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. आधीच्या सत्रात चांदीचे दर 68,239 रुपये प्रति किलो होते. हे वाचा-अ‍ॅड्रेस प्रूफशिवाय खरेदी करू शकता LPG गॅस, जाणून घ्या सोपी प्रक्रिया अजूनही रेकॉर्ड स्तरापेक्षा 7,590 रुपयांनी स्वस्त आहे सोनं गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये एमसीएक्सवर (Gold Rates on MCX) सोन्याचे भाव 56200 रुपये प्रति तोळाच्या आसपास होते. तर आज MCX वर सोनं 48,255 रुपये प्रति तोळावर आहे. अर्थात आज सोन्याचे दर प्रति तोळा 7,945 रुपयांनी स्वस्त आहेत. काय आहे जाणकारांचं मत? एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनिअर अनालिस्ट तपन पटेल यांच्या मते दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत COMEX वरील सोन्याच्या किंमतीतील घसरणीसह 73 रुपयांच्या घसरणवर व्यवहार करत होती. हे वाचा-Aadhar Card धारकांनी या चुका करणं टाळा! अन्यथा व्हॉल ऑनलाइन फ्रॉडचे शिकार दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,823 डॉलर प्रति औंस आहेत आणि चांदीचे दर  26.13 डॉलर प्रति औंसवर स्थिर आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today

    पुढील बातम्या