जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Pan-Aadhaar Link : मोदी सरकार आधार पॅन लिंकची मर्यादा वाढवणार का तुमच्याकडे फक्त 30 तास

Pan-Aadhaar Link : मोदी सरकार आधार पॅन लिंकची मर्यादा वाढवणार का तुमच्याकडे फक्त 30 तास

आधार पॅनकार्ड लिंक

आधार पॅनकार्ड लिंक

30 जूननंतर मात्र तुम्हाला आधार पॅन लिंक करता येणार नाही. तुम्ही हे केलं नाही तर तुमचं पॅनकार्ड डिअॅक्टिवेट होईल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : तुमच्याकडे फक्त 30 तास उरले आहेत. मोदी सरकार आधार पॅनकार्ड लिंक करण्याची मुदत वाढवणार का याची धाकधूक वाढली आहे. अजूनही बऱ्याच लोकांनी आधार पॅन लिंक केले नाहीत. त्यांच्यासाठी ही शेवटची संधी असल्याचं सांगितलं जात आहे. अजूनही जर तुम्ही आधार पॅन लिंक केलं नसेल तर तुमच्याकडे 30 तास शिल्लक आहेत. 30 जूननंतर मात्र तुम्हाला आधार पॅन लिंक करता येणार नाही. तुम्ही हे केलं नाही तर तुमचं पॅनकार्ड डिअॅक्टिवेट होईल. तुम्हाला 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. त्यापेक्षा १००० रुपये भरुन आता आधार पॅन लिंक करणं केव्हाही फायद्यात राहील. याशिवाय तुमची अनेक कामं अडण्याची शक्यताही आहे.

PAN Card संबंधित एक चूक आणि भरावा लागेल 10 हजार रुपयांचा दंड, आजच करुन घ्या चेक

आधार पॅन लिंक नसेल तर तुमचं EPFO, आयकर भरणे, आयकरशी संबंधित कोणतीही कामं होणार नाहीत. त्यामुळे तुम्ही तातडीने आधार पॅन लिंक करणं गरजेचं आहे. तुम्ही पॅन-आधार लिंक न केल्यास तुमचे पॅन कार्ड बंद होईल. असं झाल्यास कार्डहोल्डर म्युच्युअल फंड, शेअर बाजारातील गुंतवणूक यासारख्या गोष्टी करू शकणार नाहीत. इतकंच नाही तर आजच्या काळात बँक खाते उघडण्यापासून ते रिअल इस्टेट किंवा इतर कोणत्याही व्यवहारापर्यंत पॅनकार्ड हा सर्वात महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न पाहता हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यातच शहाणपण आहे. कसं करायचं आधार पॅन लिंक? आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या, www.incometax.gov.in वर लॉग इन करा. क्विक लिंक्स विभागात जा आणि आधार लिंक वर क्लिक करा. तुमच्या स्क्रीनवर एक नवीन विंडो उघडेल. तुमचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक येथे टाका. ‘I validate my Aadhaar details’ हा पर्याय निवडा. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP प्राप्त होईल. ते भरा आणि नंतर ‘Validate’ वर क्लिक करा. दंड भरल्यानंतर तुमचा पॅन आधारशी लिंक केलं जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात