मुंबई, 15 मे : LIC IPO मध्ये शेअर्स अलॉटमेंटमध्ये (LIC Share Allotment ) तुम्हाला शेअर मिळाले नाही तरीही तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, तर आणखी दोन दिवस प्रतीक्षा करा. त्यानंतर तुम्ही LIC चे शेअर्स स्वस्तात खरेदी करू शकाल. 17 मे रोजी एलआयसी शेअर्सची लिस्टिंग (LIC Share Listing) होईल. या दिवसापासून शेअर बाजारात कंपनीच्या शेअर्सची खरेदी-विक्री सुरू होईल. म्हणजेच, दोन दिवसांनी तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही एलआयसीच्या शेअर्समध्ये खरेदी-विक्री करू शकता. एलआयसी शेअर स्वस्तात खरेदी करा तुम्ही विचार करत असाल की तुम्ही एलआयसी शेअर स्वस्तात कसे खरेदी करू शकता. एलआयसीने त्यांच्या शेअरची इश्यू प्राईज 949 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. म्हणजेच, ज्यांनी LIC IPO मध्ये गुंतवणूक केली आणि शेअर्स वाटप केले, त्यांच्यासाठी प्रति शेअर किंमत 949 रुपये होती. Cibil स्कोअर जितका चांगला तितकी कर्ज मिळण्याची शक्यता वाढते; लगेच चेक करा तुमचा सिबिल स्कोअर तर आता ग्रे मार्केटमध्ये एलआयसीच्या शेअर्सची किंमत त्याच्या इश्यू किंमतीपेक्षा कमी राहते. टॉप शेअर ब्रोकरच्या डेटानुसार, सध्या LIC IPO चा ग्रे मार्केट प्रीमियम उणे 18 रुपये आहे. याचा अर्थ LIC चे शेअर्स 18 रुपयांच्या डिस्काऊंटसह खुल्या बाजारात लिस्ट केले जाऊ शकतात. आज तकने याबाबतचं वृत्त दिलं आहे. Pension Scheme: ‘या’ सरकारी योजनेतून निवृत्तीनंतर मिळेल पेन्शन, किती आणि कुठे करावी लागेल गुंतवणूक? चेक करा म्हणजेच LIC चा शेअर 949 रुपयांऐवजी 931 रुपयांना लिस्ट होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, लिस्टिंगनंतर तुम्ही एलआयसीचे शेअर्स स्वस्तात खरेदी करू शकता. एलआयसीच्या आयपीओला सर्व श्रेणींमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सर्वाधिक सबस्क्रिप्शन पॉलिसीधारकांच्या श्रेणीत होते जेथे IPO 6.12 पट सबस्क्राइब झाला होता. त्याचप्रमाणे, एलआयसी कर्मचार्यांसाठी राखीव भाग 4.4 पट सबस्क्राइब झाला. एकूणच, LIC IPO ला 2.95 पट सबस्क्रिप्शन मिळाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.