मुंबई, 15 मे : आज नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या वृद्धापकाळात आपल्याकडे काहीतरी कमाईचं साधन असावं अशी इच्छा असते. जेणेकडून आर्थिक गरजा भागवणे सहज होईल. सध्या मार्केटमध्ये अनेक पेन्शन स्कीम आहेत ज्यात गुंतवणूक (Investment Option) करुन तुम्ही तुमचं भविष्य सुरक्षित करु शकता. अटल पेन्शन योजनेअंतर्गत (Atal Pension Scheme), सरकार 60 वर्षांनंतर दरमहा 1000 ते 5000 रुपये पेन्शनची हमी देते. अल्प गुंतवणुकीत पेन्शनची हमी (Pension Scheme) देण्यासाठी ही सरकारी योजना चांगला पर्याय आहे. एखाद्या व्यक्तीला निश्चितपणे वार्षिक 60,000 रुपये पेन्शन मिळेल. अटल पेन्शन योजनेसाठी नोंदणी कशी करावी लागेल आणि त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया. अटल पेन्शन योजनेत गुंतवलेल्या रकमेच्या बदल्यात सरकार 60 वर्षांनंतर पेन्शन मिळेल. या योजनेंतर्गत, निवृत्तीनंतर, दरमहा खात्यात निश्चित योगदान दिल्यानंतर, 1 हजार रुपये ते 5 हजार रुपये मासिक पेन्शन मिळेल. महाराष्ट्रातील ‘या’ बँक ग्राहकांना मोठा झटका, RBI कडून पैसे काढण्यावर बंदी; ग्राहकांच्या पैशाचं आता काय होणार? किती रक्कम भरावी लागेल? सध्याच्या नियमांनुसार, वयाच्या 18 व्या वर्षी मासिक पेन्शनसाठी योजनेत जास्तीत जास्त 5000 रुपये जोडल्यास, तुम्हाला दरमहा 210 रुपये द्यावे लागतील. हेच पैसे दर तीन महिन्यांनी दिले तर 626 रुपये आणि सहा महिन्यांत 1239 रुपये द्यावे लागतील. मासिक 1000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी गुंतवणूक केल्यास, तुम्हाला दरमहा 42 रुपये द्यावे लागतील. तरुण वयात गुंतवणुकीचा मोठा फायदा समजा तुम्ही वयाच्या 35 व्या वर्षी 5 हजार पेन्शनसाठी सामील झालात तर 25 वर्षांसाठी तुम्हाला दर 6 महिन्यांनी 5323 रुपये जमा करावे लागतील. या प्रकरणात, तुमची एकूण गुंतवणूक 2.66 लाख रुपये असेल. त्या रकमेवर तुम्हाला 5000 रुपये मासिक पेन्शन मिळेल. CIBIL स्कोरबद्दल ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींची माहिती आहे का? कर्ज घेताना होतो फायदा दुसरीकडे, तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी सामील झाल्यास, तुमची एकूण गुंतवणूक फक्त 1.04 लाख रुपये असेल. म्हणजेच, तुमचे वय जास्त असल्यास, तुम्हाला त्याच पेन्शनसाठी सुमारे 1.60 लाख रुपये अधिक गुंतवावे लागतील. योजनेची वैशिष्टे » तुम्ही पेमेंटसाठी 3 प्रकारच्या योजना निवडू शकता, मासिक गुंतवणूक, त्रैमासिक गुंतवणूक किंवा सहामाही गुंतवणूक. » आयकराच्या कलम 80 CCD अंतर्गत, त्याला कर सवलतीचा लाभ मिळतो. » सदस्याच्या नावाने फक्त 1 पेन्शन खाते उघडले जाईल. » जर सदस्याचा मृत्यू 60 वर्षापूर्वी किंवा नंतर झाला असेल, तर पेन्शनची रक्कम त्याच्या पत्नीला दिली जाईल. » जर सभासद आणि पत्नी दोघांचा मृत्यू झाला तर सरकार त्यांच्या नॉमिनीला पेन्शन देईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.