मुंबईत विनाकारण येणाऱ्यांची आज झाली दैना, या भागात सुरू आहे नाकाबंदी

मुंबईत विनाकारण येणाऱ्यांची आज झाली दैना, या भागात सुरू आहे नाकाबंदी

आज मुंबई पोलिसांनी दहिसर ऐवजी बोरीवलीला नाकाबंदी केली आहे. त्यामुळे आज पुन्हा पश्चिम द्रुतगती मार्गावर ट्रॅफिक जाम पाहायला मिळाली.

  • Share this:

मुंबई, 30 जून : राज्यात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. अशात सगळ्यात जास्त कहर हा मुंबईत पाहायला मिळतो. राज्यात लॉकडाउन (Lockdown) शिथिल केल्यानंतर काही भागात पुन्हा कोरोनाने (Coronavirus) डोकं वर काढलं. विषाणू संसर्ग बाधीत रुग्णं वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण-डोंबीवली, उल्हासनगर या महानगर पालिका क्षेत्रात (Thane, Navi Mumbai, Kalyan-Dombivali, bhiwandi,) कोरोना संसर्ग वाढणाऱ्या विभागात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आला. यामुळे आता मुंबईत विनाकारण येणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.

मुंबईत विनाकारण बाहेर फिरणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. त्याचा परिणाम पाहता मुंबई आज वर्दळ कमालीची घटली आहे. सरकारी आणि खाजगी कार्यालय कर्मचारी वगळता कोणी रस्त्यावर दिसत नाही. तर आज मुंबई पोलिसांनी दहिसर ऐवजी बोरीवलीला नाकाबंदी केली आहे. त्यामुळे आज पुन्हा पश्चिम द्रुतगती मार्गावर ट्रॅफिक जाम पाहायला मिळाली.

कोरोनाची ही 3 नवीन लक्षणं धोकादायक आहेत, त्रास झाला तर आधी करा COVID-19 टेस्ट

मुंबई पोलिसांनी बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी अशा प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी केली आहे. मुंबईत विनाकारण येणारे, दुचाकी वर 2 जण प्रवास करणारे या सगळ्यांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्यांची चांगलीच फजीती झाली आहे. पोलिसांनी अनेकांच्या गाड्या जप्त केल्या आहेत. जोगेश्वरीला जप्त केलेल्या अनेक गाड्या हायवेवरच ठेवण्यात आल्या आहेत.

कोरोना रिपोर्ट नेगिटिव्ह आला तरी शिक्षकाची आत्महत्या, सासरवाडीत घेला गळफास

मुंबई पोलिसांनी जप्त केलेल्या 16 हजार गाड्या काही पोलीस स्टेशनला आहेत तर काही रस्त्याच्या कडेलाच ठेवण्यात आल्या आहेत. या गाड्यांवर कारवाई होतेय पण कारवाई केलेल्या गाड्या ठेवायला मुंबई पोलिसांकडे जागाच नसल्याची अवस्था आहे. दहिसर हा नवा हॉटस्पॉट तर आहेच पण मुंबईच प्रवेशद्वारही आहे. या प्रवेशद्वारावर दहिसर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. या कारवाईबाबत स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम एम मुजावर यांनी यासंबंधी माहिती दिली.

कराचीमध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी ताज हॉटेलवर हल्ला करण्याची दिली धमकी

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 5257 रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे रुग्णांचा एकूण आकडा 1,69,883 झाला आहे. तर आज 181 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूची संख्या 7610 वर पोहोचली आहे. राज्यात सध्या 73298 एवढे Active रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईत आज 71 जणांचा मृत्यू झाला तर 1226 नवे रुग्ण सापडले. सलग चौथ्या दिवशी 5 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची वाढ झाली आहे.

संपादन - रेणुका धायबर

First published: June 30, 2020, 10:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading