जाहिरात
मराठी बातम्या / मनी / ऑनलाइन पैसे ट्रांसफर करण्यासाठी UPI, NEFT, IMPS आणि RTGS काय आहे फायद्याचं? वाचा

ऑनलाइन पैसे ट्रांसफर करण्यासाठी UPI, NEFT, IMPS आणि RTGS काय आहे फायद्याचं? वाचा

ऑनलाइन पैसे ट्रांसफर करण्यासाठी UPI, NEFT, IMPS आणि RTGS काय आहे फायद्याचं? वाचा

UPI, NEFT, IMPS आणि RTGS देखील पैसे पाठवण्यासाठी वापरले जाते. पण हे कसं काम करतं? हे फार कमी लोकांना माहित असावं, तसेच यांपैकी आपल्या फायद्याचं काय? चला मग जाणून घेऊ या.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 21 सप्टेंबर : ऑनलाइन व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. खरंतर कोविड काळापासून लोकं डिजीटल व्यवहार करु लागले, ज्यानंतर आता हे लोकांच्या रोजच्या जिवनाचा भाग बनला आहे. सध्या फंड ट्रान्सफरसाठी प्रामुख्याने चार पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय म्हणजे UPI जे खूप लोकप्रिय माध्यम बनले आहे. याशिवाय, NEFT, IMPS आणि RTGS देखील पैसे पाठवण्यासाठी वापरले जाते. पण हे कसं काम करतं? हे फार कमी लोकांना माहित असावं, तसेच यांपैकी आपल्या फायद्याचं काय?  चला मग जाणून घेऊ या. 1. RTGS चे फायदे आणि इतर माहिती RTGS म्हणजे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. हे वर्ष 2004 मध्ये लाँच केले गेले. यापूर्वी बँकेकडून वैयक्तिकरित्या निधी हस्तांतरण केले जात होते. यामध्ये रिअल टाईम आधारित व्यवहार सेटल केला जातो. ती रिझर्व्ह बँक स्वतः चालवते. त्याची सुविधा 14 डिसेंबर 2020 पासून 24 तास उपलब्ध आहे. RTGS साठी कोणतीही उच्च मर्यादा नाही, जरी किमान व्यवहार मूल्य 2 लाख रुपये असावे. जे विनामुल्य आहे. पण 2-5 लाख रुपयांच्या व्यवहारासाठी 25 रुपये प्रक्रिया शुल्क आणि 5 लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहारासाठी 50 रुपये प्रक्रिया शुल्क आकारले जाते. हे वाचा : ICICI बँकेकडून अलर्ट, या ग्राहकांना Transaction वर भरावे लागणार जास्त पैसे 2. NEFT फायदे आणि इतर माहिती -ऑनलाइन पेमेंटची दुसरी पद्धत म्हणजे NEFT ज्याला नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर असेही म्हणतात. NEFT ची सुरुवात 2005 मध्ये झाली. आजच्या तारखेला हा एक अतिशय लोकप्रिय पैसे ट्रांसफर करण्याचा पर्याय आहे. सध्या UPI आणि IMPS चा ट्रेंड जास्त आहे. परंतु 2017 पर्यंत, एनईएफटीमध्ये वार्षिक आधारावर 40 टक्क्यांनी वाढ होत होती. -पूर्वी NEFT ट्रांसफर वेगवेगळ्या बॅचमध्ये सेटल केले गेले होते, जे दिवसातून एकदाच केलं जात होतं. नंतर दोन ट्रांसफरमधील अंतर 2-2 तासांपर्यंत कमी करण्यात आले. आता दोन ट्रांजॅक्सनमधील अंतर अर्धा तास आहे. - NEFT साठी किमान व्यवहार मर्यादा नाही. 1 रुपया देखील तुम्ही ट्रांसफर करु शकता. हे सगळं रिझर्व्ह बँक देखील चालवते. हे वाचा : तुमचं या बँकेत खातं? आनंदाची बातमी, RBI ने हटवले निर्बंध 3. IMPS फायदे आणि इतर माहिती IMPS म्हणजेच तात्काळ पेमेंट सिस्टम जी2010 मध्ये सुरू करण्यात आली. तोपर्यंत RTGS, NEFT च्या मदतीने मर्यादित वेळेत ऑनलाइन निधी हस्तांतरण केले जात होते. नंतर NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काही बँकांच्या सहकार्याने IMPS सुरू केले. हे 24x7 कार्य करते. हे अधिकृतपणे नोव्हेंबर 2010 मध्ये लॉन्च केले गेले. सुरुवातीला त्याची मर्यादा 2 लाख होती, आता ती वाढवून 5 लाख करण्यात आली आहे. त्याच्या मदतीने, रिअल टाइम फंड ट्रान्सफर दिवसाचे 24 तास केले जाते. अनेक बँकांसाठी ते मोफत आहे, तर अनेक बँका त्यासाठी 2.5 ते 25 रुपये आकारतात. 4. UPI आता UPI बद्दस तर अनेकांनाच माहिती आहे. याला युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणतात. गेल्या काही वर्षांत त्याची लोकप्रियता खूप वाढली आहे. UPI च्या मदतीने दर महिन्याला 10 लाख कोटींचे व्यवहार केले जातात. व्यवहारांची संख्या 600 कोटींहून अधिक आहे. 2016 मध्ये UPI लाँच करण्यात आले. त्याची सुविधा 24 x 7 करण्यात आली आहे. आतापर्यंत ते पूर्णपणे विनामूल्य आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात