मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एका बँकेवर लावलेले काही निर्बंध हटवले आहेत. त्याचा फायदा बँक आणि ग्राहकांना होणार आहे. RBI ने सेंट्रल बँकच्या PCA फ्रेमवर्क Prompt Corrective Action Framework मधून बाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे. सेंट्रल बँक २०१७ पासून PCA च्या लिस्टमध्ये होतं. खराब आर्थिक वर्षांमुळे या यादीमध्ये बँकेचं नाव गेलं होतं. आता या यादीमधून नाव काढून टाकण्यात आलं आहे. या लिस्टमध्ये यूको बँक, आयडीबीआय बँक, ओवरसीज बँकांची नावं देखील आहेत. आता या सगळ्या बँका एक एक करून या लिस्टमधून बाहेर होत असल्याचं दिसत आहे. यामध्ये सेंट्रल बँकेचं नाव होतं मात्र आता तेही काढलं जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. रिझर्व्ह बँकेनं याबाबत प्रेस नोट जारी केली आहे. गेल्या काही वर्षांची कामगिरी पाहता सेंट्रल बँकेबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. RBI ने दिलेल्या सगळ्या नियमांचं पालन बँकेनं आर्थिक वर्षात नीट केलं. याशिवाय हे नियम पाळण्याबाबत लिखित आश्वासन दिलं आहे. त्यामुळे RBI ने हा निर्णय घेतल्याचं निवेदनात म्हटलं आहे. बँकेचा नेट प्रॉफिट २३४ कोटींहून अधिक झाला आहे. गेल्या वर्षांत जून महिन्यात हा आकडा २०५ कोटींवर होता. जून ते जून विचार करायचा झाला तर बँकेनं चांगली प्रगती केली आहे. मागच्या ५ महिन्यांत बँकेची कामगिरी चांगली राहिल्याचं RBI ने म्हटलं आहे. हे वाचा-ICICI बँकेकडून अलर्ट, या ग्राहकांना Transaction वर भरावे लागणार जास्त पैसे
We are are happy to inform that Central Bank of India is out of RBI's Prompt Corrective Action Framework.We Congratulate our Stakeholders and Valued Customers for their unstinted support.#RBI #CentralToYouSince1911 pic.twitter.com/vjcHYX1bpW
— Central Bank of India (@centralbank_in) September 20, 2022
जेव्हा बँकेची आर्थिक स्थिती बिघडायला लागते तेव्हा भारतीय रिझर्व्ह बँक बँकांना PCA फ्रेमवर्कच्या लिस्टमध्ये ठेवते. NPA वाढणे, भांडवल कमी होणे आणि मालमत्तेवरील घटते रिटर्न यामुळे बँकांना पीसीए फ्रेमवर्कच्या लिस्टमध्ये नाव लिहिलं जातं. पीसीए फ्रेमवर्कच्या यादीत नाव आल्यानंतर वेगवेगळे निर्बंध लादले जातात. हे वाचा-ATM कार्डवर मिळतो 10 लाख रुपयांचा विमा! क्लेम करण्यासाठी आहे सोपी प्रोसेस यामध्ये नवीन शाखा उघडणे, व्यवस्थापनाला पेन्शन भत्ते अशा अनेक महत्त्वाच्या कामांवर बंदी घातली जाते. अशा परिस्थितीत बँकेच्या गुंतवणूकदारांनाही त्यांची भांडवली गुंतवणूक वाढवण्यास सांगितले जाते. RBI PCA फ्रेमवर्कमध्ये समाविष्ट असलेल्या बँकेच्या कामकाजावर लक्ष ठेवते आणि तिची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतरच बँकेला PCA फ्रेमवर्कमधून बाहेर काढले जाते.