मुंबई : तुमचंही आयसीआयसीआय बँकेत खातं आहे का? तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. या ग्राहकांसाठी बँकेनं अलर्ट जारी केला आहे. icici बँकेचं क्रेडिट कार्ड ज्या ग्राहकांकडे आहे त्यांनी याकडे दुर्लक्ष करू नये. नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं. RBI ने काही नियमात बदल केले आहेत. ते बदल १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. जर तुम्ही आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवरून पेमेंट केलं तर तुम्हाला जास्तीचे पैसे भरावे लागणार आहेत. २० ऑक्टोबरपासून हा नियम लागू करण्यात येणार आहे. क्रेडिट कार्डने पेमेंट करणाऱ्यांवर १ टक्के अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार आहे. हे वाचा-ATM कार्डवर मिळतो 10 लाख रुपयांचा विमा! क्लेम करण्यासाठी आहे सोपी प्रोसेस क्रेडिट कार्डचा दुरुपयोग होऊ नये यासाठी बँकेनं हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय एटीएममधून देखील क्रेडिट कार्डद्वारे पैसे काढले जातात. कॅश ट्रान्सफर करणं किंवा काढणं किंवा त्याशिवाय आणखी सेवांचा दुरुपयोग सुरू झाल्याने बँकेनं हा निर्णय घेतला आहे. हे वाचा-फोन चोरीला गेल्यानंतर बँकिंग फ्रॉडपासून वाचण्याठी नक्की करा ‘हे’ काम तुम्ही जर घरभाडं भरण्यासाठी क्रेडिट कार्डचा उपयोग करत असाल आता त्यासाठी देखील तुम्हाला जास्तीचं शुल्क भरावं लागणार आहे. क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यानंतर प्रत्येक देवाण घेवाणीवर ०.४६ ते २.३६ टक्के जास्तीचं शुल्क आकारलं जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.