नवी दिल्ली, 03 ऑक्टोबर: केंद्र सरकारकडून कांद्याच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी विविध प्रयत्न केले जात असल्याचा दावा केला जात आहे. तरी देखील आजही देशातील विविध भागात कांद्याच्या दरात (Onion Price) मोठी तफावत पाहायला मिळते आहे. अनेक राज्यांमध्ये कांद्याने शंभरी गाठली आहे. सरकारी आकड्यांच्या मते बेंगळुरुमध्ये कांद्याचा किरकोळ भाव 100 रुपये किलो आहे. कर्नाटक देशातील तिसरे मोठे कांदा उत्पादक राज्य आहे तरी देखील याठिकाणी कांद्याचे भाव इतके आहेत. तर दुसरीकडे राजस्थानच्या उदयपूर आणि पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट याठिकाणी कांद्याचे दर 35 रुपये किलो आहेत.
सरकार सध्या सुमारे 114 शहरांवर नजर ठेवून आहे. या 114 शहरांमध्ये दररोज किंमतींचे परीक्षण केले जाते. अखिल भारतीय पातळीवर सोमवारी कांद्याचे सरासरी दर 70 रुपये प्रति किलो होते. त्याच वेळी, ज्या राज्यात कांद्याचे उत्पादन चांगले आहे, त्याठिकाणी भावात वाढ झाली आहे.
महाराष्ट्रात कांद्याचे दर 77 रुपये
महाराष्ट्रात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन होते. याठिकाणी कांद्याचे किरकोळ मुल्य 77 रुपये प्रति किलो आहे. मुख्य उत्पादक राज्य असणाऱ्या महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये यावर्षी पावसामुळे खरिप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारकडून विविध पावलं उचलली जात आहेत. यामध्ये निर्यातीवर बंदी आणि व्यापाऱ्यांवर साठा करण्यावर मर्यादा लादणे यांसारखे निर्णय समाविष्ट आहेत.
(हे वाचा-कोट्यवधी कर्जदारांना मिळणार दिलासा? 5 नोव्हेंबरला SC मध्ये पुढील सुनावणी)
दिल्लीत 65 रुपये किलो दर
दिल्लीत कांद्याचे किरकोळ भाव 65 रुपये प्रति किलो आहेत. कोलकातामध्ये 70 रुपये तर चेन्नईमध्ये 72 रुपये आहे. सरकारी आकड्यांमध्ये जे किरकोळ मुल्य दिले जाते ते साधारणपणे व्यवहारातील आकड्यांपेक्षा 10 ते 12 रुपयांनी कमी असते. गुणवत्ता आणि स्थान हे यामागचे महत्त्वाचे कारण आहे.
(हे वाचा-बायकोचं ATM कार्ड वापरताय तर आधीच व्हा सावधान! वाचा काय आहे नियम)
सरकारकडून बफर स्टॉकमधील कांदा बाजारपेठेत आणला जात आहे, जेणेकरून कांद्याची उपलब्धता वाढेल. त्याचप्रमाणे खाजगी व्यापाराच्या माध्यमातून आयाती संदर्भात नियमांना ढील देण्यात आली आहे. देशात महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक हे तीन प्रमुख कांदा उत्पादक राज्य आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Onion, Priceonion