मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Multibagger Share: TATA च्या 'या' शेअरमुळे गुंतवणूदार बनले कोट्यधीश! एक लाख झाले दोन कोटी रुपये

Multibagger Share: TATA च्या 'या' शेअरमुळे गुंतवणूदार बनले कोट्यधीश! एक लाख झाले दोन कोटी रुपये

गेल्या एका महिन्यात Tata Elxsi मल्टीबॅगर स्टॉक सुमारे 6565 रुपयांवरून 8850 रुपयांपर्यंत वाढला आहे, जो जवळपास 35 टक्क्यांनी वाढला आहे. तर वार्षिक जवळपास 50 टक्क्यांनी वाढला आहे.

गेल्या एका महिन्यात Tata Elxsi मल्टीबॅगर स्टॉक सुमारे 6565 रुपयांवरून 8850 रुपयांपर्यंत वाढला आहे, जो जवळपास 35 टक्क्यांनी वाढला आहे. तर वार्षिक जवळपास 50 टक्क्यांनी वाढला आहे.

गेल्या एका महिन्यात Tata Elxsi मल्टीबॅगर स्टॉक सुमारे 6565 रुपयांवरून 8850 रुपयांपर्यंत वाढला आहे, जो जवळपास 35 टक्क्यांनी वाढला आहे. तर वार्षिक जवळपास 50 टक्क्यांनी वाढला आहे.

    मुंबई, 1 एप्रिल : टाटा समूहाची (Tata Group) कंपनी Tata Elxsi गेल्या वर्षी शेअर बाजारातील मल्टीबॅगर शेअर्समध्ये (Multibagger Stock) होती. अलीकडेच शेअरने NSE वर 9420 रुपयांचा सर्वकालीन उच्चांक (all time high) गाठला होता. या शेअरने गेल्या एका वर्षात आपल्या भागधारकांना सुमारे 220 टक्के परतावा दिला आहे. टाटा एलेक्‍सी शेअरची प्राईज हिस्ट्री पाहिल्यास दिसून येते की या सॉफ्टवेअर कंपनीचा शेअरधारकांना उत्कृष्ट परतावा देण्याचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. गेल्या 13 वर्षांत हा मल्टीबॅगर स्टॉक 42.48 रुपयांवरून 8,850 रुपये प्रति शेअर झाला आहे. या कालावधीत सुमारे 20,700 टक्के वाढ झाली आहे. एका महिन्यात 35 टक्के परतावा गेल्या एका महिन्यात, हा मल्टीबॅगर स्टॉक सुमारे 6565 रुपयांवरून 8850 रुपयांपर्यंत वाढला आहे, जो जवळपास 35 टक्क्यांनी वाढला आहे. तर वार्षिक जवळपास 50 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे 2022 मध्ये देखील हा मल्टीबॅगर स्टॉक ठरु शकतो. गेल्या एका वर्षात, टाटा समूहाचा हा शेअर सुमारे 2775 रुपयांवरून 8850 रुपयांपर्यंत वाढला आहे, जो या कालावधीत सुमारे 220 टक्क्यांनी वाढला आहे. Tax on Cryptocurrency: क्रिप्टो ट्रेडवर आजपासून कर लागू, नियमांचं उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंत तुरुंगवास इतकेच नाही तर गेल्या पाच वर्षांत हा स्टॉक शोस्टॉपर राहिला आहे कारण गेल्या 5 वर्षांत या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या शेअरधारकांना 1,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्याच वेळी Tata Elxsi चे शेअर्स गेल्या 10 वर्षांत सुमारे 100 रुपयांवरून 8850 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या कालावधीत सुमारे 8,850 पट वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 13 वर्षांत, टाटा समूहाचा हा मल्टीबॅगर स्टॉक 42.48 रुपयांवरुन (NSE 2 एप्रिल 2009 रोजी बंद किंमत) आज 8,850 रुपयांवर पोहोचला आहे. सामान्यांच्या खिशाला चाप! National Highway वर टोल टॅक्स वाढल्याने आजपासून किती मोजावी लागणार रक्कम? 1 लाख 2.08 कोटी रुपये झाले जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिन्यापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याची रक्कम आज 1.35 लाख रुपये झाली असती. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी टाटा समूहाच्या या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये 1.53 लाख झाले असते. त्याचप्रमाणे जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ते काढले नसते, तर आज ती रक्कम 11 लाख रुपये झाली असती. 10 वर्षांपूर्वी टाटा समूहाच्या या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवल्यास आज ही रक्कम 88.50 लाख रुपये झाली असती. त्याच वेळी, 13 वर्षांपूर्वी जेव्हा जागतिक मंदीतून जग सावरत होते, तेव्हा एखाद्या गुंतवणूकदाराने 1 लाख रुपये टाकून पैसे काढले नसते, तर आज ती रक्कम 2.08 कोटी झाली असती.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market, Tata group

    पुढील बातम्या