Home /News /money /

Tax on Cryptocurrency: क्रिप्टो ट्रेडवर आजपासून कर लागू, नियमांचं उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंत तुरुंगवास

Tax on Cryptocurrency: क्रिप्टो ट्रेडवर आजपासून कर लागू, नियमांचं उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंत तुरुंगवास

भारतात डिजिटल मालमत्तेच्या व्यापारादरम्यान झालेल्या कोणत्याही नफ्यावर 30 टक्के कर कापला जाईल. याशिवाय, नफा असो किंवा तोटा असो, अशा कोणत्याही व्यवहारावर एक टक्का टीडीएसही कापला जाईल.

    मुंबई, 1 एप्रिल : भारतात आजपासून क्रिप्टोकरन्सीसह (Cryptocurrency) इतर डिजिटल मालमत्तेतील नफ्यावर कर आकारला जाईल. आज म्हणजेच 1 एप्रिलपासून, केंद्रीय अर्थसंकल्प 2022 दरम्यान संसदेत प्रस्तावित आणि पारित करण्यात आलेला डिजिटल मालमत्ता कायदा प्रभावी झाला आहे. डिजिटल मालमत्तेचे वर्गीकरण अद्याप अस्पष्ट असले तरी ते भारतातील व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तांना कराच्या कक्षेत आणते. आजपासून, भारतात डिजिटल मालमत्तेच्या व्यापारादरम्यान झालेल्या कोणत्याही नफ्यावर 30 टक्के कर कापला जाईल. याशिवाय, नफा असो किंवा तोटा असो, अशा कोणत्याही व्यवहारावर एक टक्का टीडीएसही कापला जाईल. जर एखाद्या व्यक्तीने हा नियम पाळला नाही तर त्याच्यासाठी समस्या उद्भवू शकतात. 7 वर्षांचा तुरुंगवास भारताच्या नवीन क्रिप्टो कायद्यानुसार, दोषींना 6 महिने ते 7 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. शिवाय दंडही आकारले जाऊ शकतो. करचुकवेगिरीच्या विशिष्ट स्वरूपावर अवलंबून, सहा महिने ते सात वर्षे तुरुंगवास आणि रक्कम जास्त झाल्यास दंड होऊ शकतो. एशियन स्कूल ऑफ सायबर लॉज (ASCL) चे संचालक आणि सह-संस्थापक देबासिस नायक यांच्या म्हणण्यानुसार, गुन्ह्याचे स्वरूप आणि पातळीनुसार दंड 200 टक्क्यांपर्यंत असू शकतो. खुशखबर!'या' बँकेने वाढवले FD वरील व्याजदर, वाचा कधी लागू होणार नवीन दर? विरोधाला न जुमानता कायदा लागू झाला भारतीय क्रिप्टो समुदायातील अनेक सदस्यांच्या विरोधाला न जुमानता, व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता (VDA) वर कर कायदे भारतात लागू करण्यात आले. रिसर्च फर्म ट्रिपल ए यांचा अंदाज आहे की आशियाई उपखंडात 10 कोटी क्रिप्टो मालक आहेत. भारताच्या 1.7 अब्ज लोकसंख्येपैकी हे प्रमाण 7.3 टक्के आहे. त्याचवेळी, क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्मला भीती आहे की या कर प्रणालीमुळे, अनेक क्रिप्टो गुंतवणूकदार भारतात स्थलांतरित होऊ शकतात. सामान्यांच्या खिशाला चाप! National Highway वर टोल टॅक्स वाढल्याने आजपासून किती मोजावी लागणार रक्कम? सवलत नाही भारत सरकारने हे स्पष्ट केले आहे की ते क्रिप्टो उद्योगातून नफा कमावणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला करात सूट देणार नाही. हे निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. खरंच, क्रिप्टो मायनिंगसाठी आवश्यक असलेल्या उपकरणांची किंमत खूप जास्त आहे आणि अशा कायद्यामुळे अनेकांना परावृत्त केले जाईल जे डिजिटल मालमत्तेच्या या नवीन वर्गासह प्रयोग करू पाहत होते.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Cryptocurrency, Tax

    पुढील बातम्या