रविवारी RTGS सेवा 14 तासांसाठी बंद राहणार; RBI ने सांगितलं कारण

रविवारी RTGS सेवा 14 तासांसाठी बंद राहणार; RBI ने सांगितलं कारण

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रविवारी 18 एप्रिल रोजी, रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट अर्थात RTGS सुविधा कमीत-कमी 14 तासांपर्यंत बंद राहणार असल्याचं सांगितलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 एप्रिल : पुढच्या रविवारी ऑनलाईन पैसे ट्रान्सफरसाठी ग्राहकांना समस्या येऊ शकते. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रविवारी 18 एप्रिल रोजी, रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट अर्थात RTGS सुविधा कमीत-कमी 14 तासांपर्यंत बंद राहणार असल्याचं सांगितलं आहे. या काळात ग्राहक RTGS द्वारे पैसे ट्रान्सफर करु शकणार नाही. 18 एप्रिल रात्री 12 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत RTGS सेवा बंद राहील.

RBI ने दिलेल्या माहितीनुसार, आपत्कालीन काळात RTGS सिस्टमचा रिकव्हरी स्पीड वाढवण्यासाठी 18 एप्रिलला RTGS चं टेक्निकल अपग्रेडेशन केलं जाईल. त्यामुळे 18 एप्रिल रविवारी आरटीजीएस सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी रविवारी ऑनलाईन ट्रान्झेक्शन करताना आपल्या पेमेंट ऑपरेशन्सचं प्लॅनिंग त्यानुसार करावं असं, आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे.

रविवारी RTGS मनी ट्रान्सफर सर्विस बंद असली, तरी NEFT द्वारे ग्राहक ऑनलाईन ट्रान्झेक्शन करू शकतात. RTGS च्या तांत्रिक सुधारणांसाठी आणि चांगल्या ट्रान्झेक्शनसाठी हे पाउल उचललं जात आहे. आरबीआयकडून याबाबत लेखी सूचना जारी करण्यात आली आहे.

(वाचा - फक्त एकदा पैसे भरा आणि आयुष्यभर दरमहा 8000 रुपये मिळवा; LIC ची खास पॉलिसी)

दरम्यान, मागील आठवड्यात RBI ने देशात NBFCs, फिनटेक स्टार्टअप्स (Fintech Startups) आणि पेमेंट बँकेला RTGS आणि NEFT द्वारे फंड्स ट्रान्सफर करण्याची परवानगी दिली आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे आता बँकांशिवाय इतर वित्तीय संस्थांनाही आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे व्यवहार करण्याची सुविधा मिळेल.

मागील वर्षी डिसेंबरमध्ये RBI ने RTGS सेवा 24 तास आणि सातही दिवस उपलब्ध केली. याआधी ही सुविधा केवळ बँक वेळेत मिळत होती. आरटीजीएससाठी कोणतंही शुल्क द्यावं लागत नाही. देशात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जुलै 2019 पासून RTGS आणि NEFT द्वारे होणाऱ्या व्यवहारांवर चार्ज आकारणं बंद केलं.

26 मार्च 2006 मध्ये RTGS सुविधा सुरू करण्यात आली होती. मोठी रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी आरटीजीएसचा वापर केला जातो. 2 लाखांहून कमी पैसे RTGS द्वारे ट्रान्सफर होत नाहीत. दोन लाखांहून कमी रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी NEFT सुविधेचा वापर केला जाऊ शकतो.

Published by: Karishma Bhurke
First published: April 12, 2021, 7:19 PM IST
Tags: rbi

ताज्या बातम्या