मुंबई, 29 नोव्हेंबर : कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन वेरिएंटचा (Omicron Variant) दबाव शेअर बाजारात दिसून येत आहे. जगभरातील शेअर बाजारात पडझड होताना दिसत आहे. आज शेअर बाजार लाल निशाण्यात सुरु झाला. शेअर बाजारातील फार्मा इंडेक्स (Pharma Index) सोडलं तर सर्व इंडेक्समध्ये पडझड दिसत आहे. निफ्टी आज 16900 च्या खाली ओपन झाला. त्यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत.
रिलायन्सचे (Reliance Industries Ltd) शेअर 2 टक्क्यांहून आधिक वाढून 50 हून अधिक अंकांनी वधारले आहेत. 9.35 वाजता सेन्सेक्समध्ये 262 अंकांची घसरण तर निफ्टीमध्ये 96 अंकांची घसरण दिसून येत होती. तर फार्मा सेक्टरमधील कंपनी सिपला (Cipla) 2.43 टक्के म्हणजेच 23.45 अंकांच्या वाढीसह टॉप गेनर होती. तर ONGC टॉप लूजर होती.
मेटल इंडेक्समध्येही (Metal Index) मोठी घसरण दिसून येत होती. Hindustan Copper, APL Apollo, Ratnamani Metals या कंपन्यांच्या शेअरमध्ये दोन टक्क्यांहून अधिकची घसरण दिसून आली.
बाजारात आणखी घसरणीची शक्यता
एंजेल वनचे सुमीत चव्हाण सांगतात की, गेल्या आठवड्यात झालेल्या घसरणीने बाजाराकडे सावध दृष्टिकोन ठेवण्याचा आमचा सल्ला योग्य ठरला आहे. मंथली चार्टवरील शूटिंग स्टार (Shooting Chart) लक्षात घेऊन, आम्ही डेली चार्टवर हेड आणि शोल्डर पॅटर्नबद्दल बोललो. 17,700 वर नेकलाइन पातळीच्या ब्रेकआउटनंतर मंगळवारच्या पॅटर्नची पुष्टी झाल्याचे दिसून आले. निगेटिव्ह बाजूने, आमचे 17,200-17,000 चे टार्गेट गाठले गेले आहे. पण ही घसरण अजून संपलेली नाही.
Weekly chart पाहिला तर असे दिसते की येत्या काही दिवसात निफ्टी 16,500 - 16,200 च्या पातळीवर गेला तर ही काही मोठी गोष्ट नाही. आम्ही खूप निराशावादी नाही, परंतु सध्याच्या किंमतीची रचना त्याच गोष्टीकडे निर्देश करत आहे. वरच्या बाजूस, निफ्टीसाठी 17,200 - 17,400 वर इमिडिएट हर्डल आहे.
आता निफ्टीला ताकद दाखवायची असेल, तर त्याला ताकदीने 17,700 चा स्तर पार करावा लागेल. मात्र सध्या तसे करणे फार कठीण वाटते. निफ्टी आधी खालच्या पातळीवर पोहोचेल अशी अपेक्षा आहे. व्यापक बाजारही विक्रीच्या दबावाला शरण जात असल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच आपण यावेळी घाईत बॉटम फिशिंग करणे टाळले पाहिजे, असंही सुमीत चव्हाण यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Share market