Home /News /money /

Gold Price Today: सोन्याचांदीचे लेटेस्ट दर जारी, काय किमतीने खरेदी करता येईल गोल्ड?

Gold Price Today: सोन्याचांदीचे लेटेस्ट दर जारी, काय किमतीने खरेदी करता येईल गोल्ड?

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचांदीच्या दरात (Gold Silver Rates) चढउतार सुरू आहे. गुरुवारी सोन्यासह चांदीच्या दरातही घसरण झाली होती. आज मात्र सोन्याचे दर वधारले आहेत.

    मुंबई, 07 जानेवारी: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचांदीच्या दरात (Gold Silver Rates) चढउतार सुरू आहे. गुरुवारी सोन्यासह चांदीच्या दरातही घसरण झाली होती. मात्र जर आजच्या दराबद्दल बोललो, तर मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Gold Rate on MCX) वर, फेब्रुवारीच्या डिलिव्हरीसाठी सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) 0.06 टक्क्यांची किंचित वाढ नोंदवली गेली आहे. तर चांदीचे भाव (Silver Price Today) 0.04 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत. 8719 रुपयांनी स्वस्त आहेत सोन्याचे दर 2020 बद्दल बोलायचे झाले ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर MCX वर 56,200 रुपये प्रति तोळाच्या सर्वोच्च पातळी (Gold Rate on Record High) गाठली होती. आज एमसीएक्सवर सोन्याची वायदे किंमत 47,481 रुपये प्रति तोळाच्या पातळीवर आहे, म्हणजेच सोने आज सुमारे 8,719 रुपयांनी स्वस्त आहे. काय आहे सोन्या-चांदीचा भाव? फेब्रुवारीच्या डिलिव्हरीसाठी सोन्याची किंमत 0.06 टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह आज 47,481 रुपये प्रति तोळा आहे. आजच्या व्यवहारात चांदी 0.04 टक्क्यांनी घसरली. या घसरणीनंतर आज सराफा बाजारात 1 किलो चांदीचा भाव 60,402 रुपये आहे. हे वाचा-Petrol Price: आज पेट्रोल-डिझेलसाठी मोजावी लागणार इतकी किंमत, वाचा लेटेस्ट दर महाराष्ट्रात सोन्याच्या दरात किरकोळ बदल (Gold Rate in Maharashtra) पाहायला मिळतो आहे. जाणून घ्या काय आहेत महत्त्वाच्या चार शहरातील सोन्या-चांदीचे दर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 24 कॅरेट सोन्याचा दर
    शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
    मुंबई48820 रुपये48830 रुपये
    पुणे48650 रुपये48660 रुपये
    नाशिक48650 रुपये48660 रुपये
    नागपूर48820 रुपये48830 रुपये
    महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 22 कॅरेट सोन्याचा दर
    शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
    मुंबई46820रुपये46830रुपये
    पुणे46130 रुपये46140 रुपये
    नाशिक46130 रुपये46140 रुपये
    नागपूर46820रुपये46830रुपये
    महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये चांदीचा दर
    शहरआजचा दर (प्रति किलो)कालचा दर (प्रति किलो)
    मुंबई60400 रुपये60600 रुपये
    पुणे60400 रुपये60600 रुपये
    नाशिक60400 रुपये60600 रुपये
    नागपूर60400 रुपये60600 रुपये
    घरबसल्या जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. हे वाचा-कर्ज घेण्याची नवी पद्धत, शेअर्स तारण ठेवून घेता येईल Loan; वाचा काय करावं लागेल? कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today

    पुढील बातम्या