नवी दिल्ली, 07 ऑगस्ट : सरकारी बँकांनंतर देशातील मोठ्या खाजगी बँकेने ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. एचडीएफसी (HDFC) बँकेने कर्जावरील दरामध्ये 0.10 टक्क्याने (HDFC Bank cuts lending rates) कपात केली आहे. नवीन दर शुक्रवार अर्थात 07 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. बँकेच्या या निर्णयानंतर ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांचे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जावरील ईएमआय (EMI) 0.10 टक्क्यांनी कमी होईल. याआधी मंगळवारी 4 ऑगस्ट रोजी यूनियन बँक ऑफ इंडियाने (Union Bank of India) व्याजदर घटवण्याचा निर्णय घेतला होता. UBI ने पगारधारक वर्गासाठी गृहकर्जावरील दर (Home Loan Rates) कमी करून 6.7 टक्के केले आहेत. यूनियन बँकेने दिलेल्या माहितीनुसार, पगारधारक लोकांना 30 लाख रुपयापर्यंत गृह कर्जावर केवळ 6.7 टक्के व्याज द्यावे लागेल. (हे वाचा- या ग्राहकांना बँकांमध्ये नाही उघडता येणार चालू खाते, RBI चा नवा आदेश )
HDFC Bank cuts lending rates by 10 bps across tenors effective today pic.twitter.com/WroQPw2nLr
— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) August 7, 2020
गुरुवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय मौद्रिक निती समितीने (MPC-Monetary Policy Committee) व्याजदरांमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने व्याजदरामध्ये कोणताही बदल केला नाही आहे. रेपो रेट 4 टक्क्यावर कायम आहे. सर्व सदस्यांच्या संमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्के कायम आहे.