जाहिरात
मराठी बातम्या / मनी / PF काढणं एकदम सोपं, तीन दिवसात 'असे' मिळतील पैसे

PF काढणं एकदम सोपं, तीन दिवसात 'असे' मिळतील पैसे

PF काढणं एकदम सोपं, तीन दिवसात 'असे' मिळतील पैसे

EPFO, PF, Employee - तुम्हाला PF मधून पैसे काढायचे असतील तर जाणून घ्या प्रक्रिया

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 सप्टेंबर : कर्मचारी भविष्य निधी संघटना ( EPFO ) लवकरच नोकरदारांसाठी खास भेट देणार आहे. लवकरच तुम्हाला तुमचा PF काढणं सोपं जाणार आहे. PF चं सेटलमेंट अवघ्या 3 दिवसांमध्ये होणार आहे. EPFO कमिशनर सुनील बर्थवाल यांच्या माहितीप्रमाणे, आता नव्या पद्धतीनं तुम्ही 3 दिवसांत PF काढू शकता. EPF नं ई इन्स्पेक्शन सुरू केलंय. कर्मचाऱ्यांच्या डेटाबेसच्या मदतीनं सेटलमेंट सुनील बर्थवाल म्हणाले, काही बाबतीत आकड्यांच्या घोटाळ्यामुळे कर्मचाऱ्यांचा युनिव्हर्सल नंबर जनरेट होत नाहीय. हे लक्षात घेता ईपीएफओ कर्मचारी डेटाबेसद्वारे पर्यायी व्यवस्थेचा विचार करतायत. ईपीएफओ असं ठरवतायत की KYC चा वापर करणाऱ्यांना तीन दिवसात PF चे पैसे मिळतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ, ‘हे’ आहेत तुमच्या शहरातले दर पूर्ण व्हायला हवं KYC EPFO च्या निर्णयानंतर तुम्ही सहज ऑनलाइन PF काढू शकता. फक्त PF अकाउंटची KYC पूर्ण झाली पाहिजे आणि आधारशी लिंक असलेली हवी. सोन्यात गुंतवणूक करून मिळवा मोठा फायदा, 1 रुपयातही ‘असं’ खरेदी करा Gold डेटाबेसमध्ये मोबाइल नंबर अपडेट हवा ईपीएफओ सर्व अकाउंट होल्डर्ससाठी एक युनिव्हर्सल अकाउंट नंबर प्रसिद्ध करतं. हा नंबर अॅक्टिवेट असणं गरजेचं आहे. तसंच कर्मचाऱ्यांचा मोबाइल नंबर डेटाबेसमध्ये अपडेट असणं जरुरी आहे. तुमचा पॅन नंबर ईपीएफओ डेटाबेसमध्ये अपडेट असायला हवा. कर्मचाऱ्यांच्या बँकेची माहिती UAN मध्ये असायला हवी. SBI च्या ग्राहकांसाठी खूशखबर! 1 ऑक्टोबरपासून मोफत होतील बँकेच्या ‘या’ सेवा कसा करणार अर्ज? तुम्हाला PF काढायचा असेल तर तुम्ही EPFO च्या ई पोर्टलवर लाॅग इन करा. त्यानंतर तुम्हाला आधार बेस्ट ऑनलाइन क्लेम सबमिशन टॅब निवडावा लागेल. पुढची स्टेप म्हणजे तुमचे KYC डिटेल्स वेरिफाय करावे लागतील. त्यानंतर क्लेम विथड्राॅल करण्यासाठी दिलेल्या पर्यायांना निवडावं लागेल. रजिस्टर्ड बँक खात्यात होईल ट्रान्सफर EPFO तुम्हाला रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर वन टाइम पासवर्ड म्हणजेच OTP पाठवेल. हा OTP एंटर करून क्लेम फाॅर्म सबमिट करावा लागेल. क्लेम प्रोसेस पूर्ण झाल्यावर रक्कम तुमच्या रजिस्टर्ड बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर होईल. बाप्पाचं विसर्जन करताना नवनीत राणा भावुक, पाहा VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pf
  • First Published :
जाहिरात
जाहिरात