मराठी बातम्या /बातम्या /मनी /

दोन हजाराच्या नोटा बाजारात कमी का झाल्या? अखेर केंद्र सरकारने खरं कारण सांगितलं

दोन हजाराच्या नोटा बाजारात कमी का झाल्या? अखेर केंद्र सरकारने खरं कारण सांगितलं

देशात चलनात असलेल्या दोन हजारांच्या नोटांचं प्रमाण बाजारात कमी का झालंय? याचं उत्तर आता केंद्र सरकारकडून देण्यात आलं आहे. केंद्र सरकारकडून संसदेत याबद्दल भूमिका मांडण्यात आली आहे.

देशात चलनात असलेल्या दोन हजारांच्या नोटांचं प्रमाण बाजारात कमी का झालंय? याचं उत्तर आता केंद्र सरकारकडून देण्यात आलं आहे. केंद्र सरकारकडून संसदेत याबद्दल भूमिका मांडण्यात आली आहे.

देशात चलनात असलेल्या दोन हजारांच्या नोटांचं प्रमाण बाजारात कमी का झालंय? याचं उत्तर आता केंद्र सरकारकडून देण्यात आलं आहे. केंद्र सरकारकडून संसदेत याबद्दल भूमिका मांडण्यात आली आहे.

  • Published by:  Chetan Patil

नवी दिल्ली, 7 डिसेंबर : देशात चलनात असलेल्या दोन हजारांच्या नोटांची संख्या (2000 Rupees Note) बाजारात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कमी झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे या नोटा चलनातून बाद होतील, अशा चर्चांना वारंवार उधाण येत होतं. त्यानंतर केंद्र सरकारकडून (Central Government) वारंवार दोन हजार रुपयांच्या नोटा बंद झालेल्या नाहीत किंवा होणार नाहीत, असं स्पष्ट करण्यात येत होतं. तरीही वारंवार या चर्चा उफाळून येत होत्या. अखेर बाजारात दोन हजारांच्या नोटा कमी होण्याचं प्रमाण नेमकं का झालंय? याचं उत्तर आता केंद्र सरकारकडून देण्यात आलं आहे. केंद्र सरकारकडून संसदेत याबद्दल भूमिका मांडण्यात आली आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात बाजारात चलनात असलेल्या दोन हजारांच्या नोटांची संख्या ही 223.3 कोटी इतकी होती. हे प्रमाण एकूण नोटांच्या (NIC) 1.75 टक्के इतके टक्के आहे. तसेच मार्च 2018 मध्ये चलनातील दोन हजार रुपयांच्या नोटा या 336.3 कोटी होत्या, अशी माहिती केंद्र सरकारकडून आज राज्यसभेत देण्यात आली.

राज्यसभेत अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी एका प्रश्नाला लेखी उत्तरात याबाबत माहिती दिली. विशेष किंमतींच्या नोटा छापण्याचा निर्णय सरकारने रिझर्व्ह बँकेशी सल्लामसलत करुन व्यवहारात सुलभता आणण्यासाठी घेतला आहे. इच्छित मूल्यांच्या नोटांची उपलब्धता ही जनतेची मागणी राखण्यासाठी आणि व्यवहार सुलभ करण्यासाठी केली जाते, अशी माहिती राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिली.

हेही वाचा : PPF मध्ये गुंतवणूक बँक, पोस्ट ऑफिसपेक्षा फायदेशीर ठरेल, व्याजदर किती मिळेल?

पंकज चौधरी नेमकं काय म्हणाले?

"देशात 31 मार्च 2018 पर्यंत चलनात असलेल्या दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण हे 336.3 कोटी (MPC) होतं. हे प्रमाण एकूण नोटांच्या (NIC) अनुक्रमे 3.27 आणि 37.26 टक्के होतं. पण त्या तुलनेने 26 नोव्हेंबर 2021 पर्यंत दोन हजारच्या नोटा या 223.3 कोटी (MPC) इतक्या चलनात आहे. हे प्रमाण एकूण नोटांच्या (NIC) अनुक्रमे 1.75 टक्के आणि 15.11 टक्के आहे", असं पंकज चौधरी यांनी सांगितलं.

हेही वाचा : मोदी सरकारच्या मदतीने सुरू करा हा व्यवसाय, होईल 50000 रुपयांचा थेट नफा

"विशेष म्हणजे 2018-19 या वित्त वर्षात दोन हजार नोटांच्या छपाई संदर्भात कोणतेही नवे मागणी पत्र करन्सी प्रिंटिंग प्रेसमध्ये आलेलं नाही. याशिवाय काही नोटा खराब होता. कारण त्या फाटता किंवा मळक्या होत्या. त्यामुळे या नोटांचं प्रमाण सध्या बाजारात कमी झालं आहे", अशी माहिती राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिली.

First published: