Home /News /money /

Nykaa चे शेअर 5 टक्क्यांची घसरले; आता गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचं मत काय?

Nykaa चे शेअर 5 टक्क्यांची घसरले; आता गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचं मत काय?

Nykaa Share ने इंट्राडेमध्ये स्टॉकने इंट्राडे लो 2,043.75 ला टच केला. जी कालच्या 2205.80 च्या क्लोजिंग प्राईजपासून 5 टक्क्यांहून अधिकची घसरण आहे.

    मुंबई, 11 नोव्हेंबर : Nykaa शेअर 79 टक्क्यांच्या मजबूत प्रीमियमवर लिस्टिंगनंतर आज इंट्राडेमध्ये 5 टक्क्यांपर्यंत घसरले. Nykaa चे शेअर आज 7.90 च्या अपसाईड गॅपने ओपन झाले परंतु नंतर प्रॉफिट बुकिंगने (Profit Booking) स्टॉकवर परिणाम झाला. इंट्राडेमध्ये स्टॉकने इंट्राडे लो 2,043.75 ला टच केला. जी कालच्या 2205.80 च्या क्लोजिंग प्राईजपासून 5 टक्क्यांहून अधिकची घसरण आहे. तज्ञांच्या मते, Nykaa च्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग आणखी चालू राहू शकते आणि हा शेअर 2000-1800 रुपयांपर्यंत घसरू शकतो. बाजारातील तज्ज्ञ गुंतवणूकदारांना या समभागात 1900 रुपयांच्या आसपास खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. विना इंटरनेट करा UPI पेमेंट, NPCI ची खास सुविधा; काय आहे प्रोसेस? Swastika Investmart चे संतोष मीना म्हणतात की Nykaa शेअर्सचे व्हॅल्युएशन हे चिंतेचे प्रमुख कारण आहे. मात्र नजीकच्या काळात या शेअरला 2000 च्या आसपास सपोर्ट मिळू शकते. मोठ्या तेजीसह लिस्टिंगनंतर सध्या या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे खूप कठीण आहे. हे लक्षात घेऊन नवीन गुंतवणूकदारांना सूचित केले जाईल की त्यांनी त्यांच्या गुंतवणुकीच्या रकमेच्या 25 टक्के रक्कम सध्याच्या पातळीवर गुंतवावी. त्यानंतर हा स्टॉक खाली येताच, हप्त्यांमध्ये गुंतवणूक करत रहावे. संतोष मीणा सल्ला देतात की ज्यांनी या शेअरमध्ये लिस्टिंग गेनसाठी गुंतवणूक केली होती त्यांनी 1950 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवावा PF वर किती मिळेल व्याज? या दिवशी EPFO च्या बैठकीत होणार निर्णय; वाचा सविस्तर GCL सिक्युरिटीजचे रवी सिंघल म्हणतात की Nykaa मधील ही घसरण प्रॉफिट बुकिंगमुळे झाली आहे. पुढील 2-3 ट्रेडिंग सेशनमध्ये प्रॉफिट बुकिंग दिसेल. इमिडिएट शॉर्ट टर्ममध्ये हा शेअर 1900 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. या पातळीच्या जवळ आढळल्यास, हा स्टॉक लाँग टर्मसाठी खरेदी केला जाऊ शकतो. यासाठी 1770 चा स्टॉप लॉस ठेवा. पुढील 2 वर्षात हा शेअर 3600 रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Money, Share market

    पुढील बातम्या