Home /News /money /

Nykaa च्या शेअरमध्ये महिनाभरात 24 टक्क्यांची घसरण, आता गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचं मत काय?

Nykaa च्या शेअरमध्ये महिनाभरात 24 टक्क्यांची घसरण, आता गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचं मत काय?

Nykaa शेअरने 26 नोव्हेंबर 2021 रोजी BSE वर 2574 रुपयांच्या त्यांच्या ऑलटाईम हायला स्पर्श केला होता. मात्र त्यानंतर शेअरमध्ये जवळपास 35 टक्क्यांनी घसरण होऊनही, शेअर 1,125 रुपयांच्या इश्यू किमतीपेक्षा सुमारे 45 टक्के वर आहे.

    मुंबई, 28 जानेवारी : शेअर बाजारात आलेल्या मोठ्या घसरणीदरम्यान नवीन टेक स्टॉक्सवर विक्रीचा दबाव आहे. Nykaa शेअर्सवरही हा दबाव दिसून येत आहे, ज्यामुळे शेअर 2574 रुपयांच्या ऑल टाऊम हायवरून 35 टक्क्यांनी घसरला आहे. त्याच वेळी, Nykaa च्या शेअरच्या किमती गेल्या एका महिन्यात सुमारे 24 टक्क्यांनी घसरल्या आहेत. Nykaa शेअरने 26 नोव्हेंबर 2021 रोजी BSE वर 2574 रुपयांच्या त्यांच्या ऑलटाईम हायला स्पर्श केला होता. मात्र त्यानंतर शेअरमध्ये जवळपास 35 टक्क्यांनी घसरण होऊनही, शेअर 1,125 रुपयांच्या इश्यू किमतीपेक्षा सुमारे 45 टक्के वर आहे. आज शेअर 10.15 टक्क्यांच्या वाढीसह 1631 रुपयांवर बंद झाला आहे. Nykaa शेअर नोव्हेंबर 2021 मध्ये लिस्ट झाला आहे. SEBI रेजिस्टर्ड पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस फर्म Piper Serica चे फाऊंडर आणि फंड मॅनेजचर अभय अग्रवाल म्हणाले की, Nykaa शेअर्सवर त्याच्या जागतिक समकक्ष कंपन्यांप्रमाणेच दबाव दिसत आहे. जगभरातील ऑनलाइन मार्केटप्लेस कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. चीनच्या स्टॉक मार्केटमध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली आहे, जिथे ऑनलाइन मार्केटप्लेस त्यांच्या अनेक वर्षांच्या नीचांकी पातळीवर ट्रेड करत आहेत. यूएस फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवण्याचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदारांनी हाय वॅल्युएशन कन्जुमर टेक कंपन्यांमधून पैसे काढून ते सुरक्षित ठेवण्यास सुरुवात केली असून, त्याचा परिणाम त्यांच्या शेअर्सवर दिसून येत आहे. नोकरीऐवजी 2 लाख रुपयांमध्ये सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दर महिन्याला मिळेल 5 लाखांचा भरघोस नफा, जाणून घ्या अभय अग्रवाल पुढे म्हणतात जोपर्यंत Nykaa चे तिसर्‍या तिमाहीचे निकाल जाहीर करत नाही तोपर्यंत त्याच्या शेअरच्या किमतीवर दबाव राहील. गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे Nykaa मध्ये गुंतवण्यापूर्वी युनिट लेव्हल इकोनॉमिक्समध्ये सुधार आणि AOV आणि GMV मध्ये मजबूत वाढ पाहायची आहे. माजी इन्व्हेस्टमेंट बँकर फाल्गुनी नायर यांनी 2012 मध्ये FSN E-Commerce Ventures Ltd ची स्थापना केली, जी Nykaa नावाचे ऑनलाइन मार्केटप्लेस चालवते. Nykaa त्याच्या प्लॅटफॉर्मवर ब्युटी आणि वेलनेस प्रोडक्ट विकते. यात Nykaa आणि Nykaa Fashion असे दोन बिझनेस आहे. Multibagger Share : 'या' शेअरची किंमत सहा दिवसात 29 रुपयांवरुन 42 रुपये चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बगाडिया गुंतवणूकदारांना सल्ला देतात की जर Nykaa शेअरची किंमत 1,570 च्या पातळीच्या खाली गेली तर गुंतवणूकदारांनी या पातळीवर खरेदी करणे टाळावे कारण स्टॉक पुन्हा 1,400 च्या पातळीवर घसरू शकतो.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या