Home /News /money /

Multibagger Share : सहा दिवसात 29 रुपयांवरुन 42 रुपये, 'या' स्टॉकमुळे गुंतवणूकदार मालामाल

Multibagger Share : सहा दिवसात 29 रुपयांवरुन 42 रुपये, 'या' स्टॉकमुळे गुंतवणूकदार मालामाल

भक्ती जेम्स अँड ज्वेलरीचा (Bhakti Gems and Jewellery Ltd) हा स्टॉक आहे. या फॅशन स्टॉकची किंमत 29.05 रुपये (19 जानेवारी 2022 रोजी BSE वर बंद किंमत) वरून आज गेल्या 6 ट्रेडिंग सत्रांमध्ये 42.65 रुपये झाली आहे.

    मुंबई, 28 जानेवारी : शेअर बाजारात असे अनेक स्टॉक्स आहेत जे कमी गुंतवणुकीत जास्त परतावा देतात. मात्र अशा स्टॉक्सची शेअर वेळेत निवड करणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. जर तुम्ही देखील शेअर बाजारात स्टॉक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा स्टॉकबद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत फक्त 6 ट्रेडिंग सत्रांमध्ये 29 रुपयांवरून 42 रुपयांपर्यंत वाढली आहे. गेल्या दोन आठवड्यांत प्रमुख बेंचमार्क निर्देशांकांमध्ये प्रचंड विक्री होऊनही, काही स्मॉल कॅप शेअर्सनी त्यांच्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. भक्ती जेम्स अँड ज्वेलरीचा (Bhakti Gems and Jewellery Ltd) हा स्टॉक आहे. या फॅशन स्टॉकची किंमत 29.05 रुपये (19 जानेवारी 2022 रोजी BSE वर बंद किंमत) वरून आज गेल्या 6 ट्रेडिंग सत्रांमध्ये 42.65 रुपये झाली आहे. या कालावधीत सुमारे 46 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. अर्थसंकल्पानंतर Mobile, Gadgets स्वस्त होणार? जाणून घ्या सरकार काय पाऊल उचलणार? Bhakti Gems and Jewellery Ltd शेअरची प्राईज हिस्ट्री भारतीय शेअर बाजारात पडझड सुरु असूनही, या फॅशन स्टॉकने 5 पैकी 3 सत्रांमध्ये 5 टक्के अपर सर्किट मारले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून हा शेअर आपल्या भागधारकांना जोरदार परतावा देत आहे. गेल्या एका महिन्यात शेअर 14.71 रुपयांवरून 42.65 रुपयांपर्यंत वाढले आहे, या कालावधीत 190 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 6 महिन्यांत, स्टॉक 17.85 रुपयांवरून 42.65 रुपयांपर्यंत वाढला आहे, या काळात जवळपास 140 टक्के वाढ झाली आहे. PVC Aadhaar मागवणं आता आणखी सोपं, एका ऑर्डरमध्ये येईल संपूर्ण कुटुंबाचं Card Bhakti Gems and Jewellery Ltd च्या शेअरच्या किमतीच्यानुसार, त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 91.95 आहे जो त्याने गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात बनवला होता तर 52 आठवड्यांचा नीचांक 10.60 होता जो नुकताच नोव्हेंबर 2021 मध्ये बनला होता. फॅशन कंपनीचे प्रति शेअर बुक व्हॅल्यू 15 रुपयांपेक्षा थोडे जास्त आहे, तर तिचे ट्रेड व्हॉल्यूम 2,34,295 आहे, जे 20 दिवसांच्या सरासरी ट्रेड व्हॉल्यूम 3,86,535 पेक्षा कमी आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या