Home /News /money /

Success Story : 50 व्या वर्षी सुरू केला Startup; Nykaaच्या Falguni Nayar जगातल्या अब्जाधीशांच्या पंक्तीत

Success Story : 50 व्या वर्षी सुरू केला Startup; Nykaaच्या Falguni Nayar जगातल्या अब्जाधीशांच्या पंक्तीत

ब्युटी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Nykaa च्या संस्थापक फाल्गुनी नायर यांनी Hurun Global Rich List 2022 मध्ये सर्वात श्रीमंतांच्या यादीत नव्यानं प्रवेश केलाय.

    नवी दिल्ली, 16 मार्च :  ब्युटी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Nykaa (Beauty e-commerce platform Nykaa) च्या संस्थापक फाल्गुनी नायर यांनी (Nykaa’s founder Falguni Nayar) Hurun Global Rich List 2022 मध्ये सर्वात श्रीमंतांच्या यादीत नव्यानं प्रवेश केलाय. Hurun Global Rich List मधील भारतातील सर्वात श्रीमंतांच्या पंक्तीत जाऊन बसलेल्या फाल्गुनी नायर यांच्यासह त्यांचे पती संजय नायर हे देखील या यादीत आहेत. 2022 M3M Hurun Global Rich List मध्ये नव्यानं प्रवेश केलेल्या टॉप 10 मध्ये हे दोघे पती-पत्नी असल्याचं संस्थेनं प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. प्रथमच, सहा भारतीय स्टार्ट अप बिझिनेस संस्थापकांनी 2022 M3M Hurun Global Rich List मध्ये प्रवेश केला. Nykaa IPO च्या यशामुळं नायर यांचा या यादीत प्रवेश झाला आहे. "Falguni Nayar यांची Nykaa कंपनी ही एक सौंदर्य आणि फॅशन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. या कंपनीनं ही यादी तयार झाल्यानंतर एक लाख कोटींच्या भांडवली बाजारमूल्याचा आकडा पार केला आहे. 10 नोव्हेंबरला जेव्हा Nykaa BSE आणि NSE वर सूचीबद्ध झाले, तेव्हा नायर यांच्या संपत्तीनं नवीन उंची गाठली. यामुळं फाल्गुनी नायर भारतातील सर्वात श्रीमंत महिला अब्जाधीश बनल्या. या यशासह, Nykaa च्या संस्थापक आणि CEO फाल्गुनी नायर यांचा भारत ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्समध्ये (अब्जाधीशांच्या यादीत) सामील झाल्या. यात आणखी केवळ सहा महिला आहेत. हा विक्रम 2012 पासून त्यांच्या मुकुटात रोवला गेला आहे. “मी 50 व्या वर्षी कोणताही अनुभव नसताना Nykaa सुरू केली. मला आशा आहे की, Nykaa चा प्रवास तुमच्यापैकी प्रत्येकाला तुमच्या आयुष्यात सफल होण्यासाठी प्रेरणा देईल," असं त्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) मध्ये त्यांच्या कंपनीचा यादीत समावेश झाल्यानंतर म्हणाल्या. Nykaa चे जवळपास अर्धे शेअर्स असलेल्या फाल्गुनी नायर यांच्या संपत्तीची किंमत आता $6.5 बिलियन आहे. त्यांच्या कंपनीचे शेअर्स 89 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले. हे वाचा - 10 मिनिटांत किराणा घरपोच देण्याचा दावा करणाऱ्या कंपनीशी झोमॅटोने बांधलं संधान 2012 मध्ये, नायर वयाची 50 वर्ष पूर्ण करण्याच्या जवळ पोहोचल्या होत्या. तेव्हा त्यांना Nykaa ची कल्पना सुचली, ज्याचा उद्देश देशातील महिला आणि पुरुषांना ऑनलाइन सौंदर्य उत्पादनं मिळवून देणं हा होता. पूर्वी, बहुतेक भारतीय सौंदर्य उत्पादनं खरेदी करण्यासाठी लहान, शेजारच्या दुकानांवर अवलंबून असत. Nykaa लाँच केल्यावर, सौंदर्यप्रसाधनं आणि स्किनकेअर उत्पादनं फक्त फोन टॅपच्या अंतरावर होती आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड आणि ज्यांच्याबद्दल कधीच ऐकलंही नव्हतं, अशा पर्यायांच्या श्रेणीमध्ये प्रचंड वाढ झाली. हे वाचा - Petrol-Diesel Price :पेट्रोल-डिझेल दर कमी होणार? क्रूड ऑइल किमतीत मोठी घसरण Nykaa लाँच करण्याच्या आपल्या कल्पनेबद्दल फाल्गुनी म्हणतात, “मला अशा स्त्रियांसाठी उभं राहायचं होतं, ज्यांना स्वतःसाठी सुंदर व्हायचं आहे. पुरुष किंवा इतर स्त्रियांना दाखवण्यासाठी नाही.” कोटक महिंद्रा बँकेत दीर्घकाळ काम केल्यानंतर त्या इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये व्यवस्थापकीय संचालक या पदावर होत्या. तिथंच त्यांनी तिथली कारकीर्द संपवली. फाल्गुनी नायर यांना Nykaa मध्ये प्रचंड यश मिळालं. पण तरीही कंपनीला "अजून मोठा पल्ला गाठायचा आहे", असा विश्वास त्यांना आहे. 2022 M3M Hurun Global Rich List मध्ये 31 उद्योग आणि 178 शहरांमधून विक्रमी 490 नवीन चेहरे जोडले गेले आहेत. या यादीत भारतातील 51 अब्जाधीश जोडले गेले आहेत. यासह भारतीयांनी यूकेला मागे टाकत या यादीत तिसरे स्थान पटकावलं आहे. युकेमधील 22 अब्जाधीशांचा यावर्षीच्या यादीत समावेश झाला आहे.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Business News, Startup Success Story

    पुढील बातम्या