मराठी बातम्या /बातम्या /मनी /

पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी कमी होणार? केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी कमी होणार? केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

Petrol Deise Price Hike, कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती खाली आणण्यासाठी प्रमुख अर्थव्यवस्थांच्या धर्तीवर भारत आपल्या स्ट्रॅटेजिक रिझर्व्हमधून कच्चे तेल काढण्याच्या शक्यतांचाही विचार करत आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 23 नोव्हेंबर : पेट्रोल डिझेलच्या (Petrol-Deisel Prise Hike) वाढलेल्या किंमतीमुळे त्याचा परिणाम अप्रत्यक्षरित्या सर्वसामन्यांवर महागाईच्या रुपाने होऊ लागला आहे. केंद्र सरकाराने (Central Government) दिवाळीआधी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात  (Excise Duty) कपात केली होती. त्यामुळे पेट्रोल दर 5 रुपयांनी तर डिझेलचे दर 10 रुपयांनी कमी झाले होते. आता केंद्र सरकार पुन्हा एकदा सर्वसामान्यांना दिलासा देण्याची तयारी करत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती कमी करण्यासाठी सरकार नवीन योजना तयार आखत आहे. जगभरात कच्च्या तेलाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे अनेक देश आपापल्या पातळीवर या समस्येला तोंड देण्याचा प्रयत्न करत आहेत. कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती खाली आणण्यासाठी प्रमुख अर्थव्यवस्थांच्या धर्तीवर भारत आपल्या स्ट्रॅटेजिक रिझर्व्हमधून (Strategic Oil Reserves) कच्चे तेल काढण्याच्या शक्यतांचाही विचार करत आहे.

50 लाख बॅरल तेल काढण्याची सरकारची योजना

कच्च्या तेलाच्या किमती खाली आणण्यासाठी इतर प्रमुख अर्थव्यवस्थांशी समन्वय साधून भारत आपल्या स्ट्रॅटेजिक रिझर्व्हमधून 50 लाख बॅरल तेल काढण्याची योजना आखत आहे.

एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले की, स्ट्रॅटेजिक रिझर्व्हमधून काढलेले कच्चे तेल मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (MRPL) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांना विकले जाईल. हे दोन्ही सरकारी तेल शुद्धीकरण युनिट पाईपलाइनद्वारे स्ट्रॅटेजिक रिझर्व्हशी जोडलेले आहेत.

Multibagger Stock : वर्षभरात अवघ्या 6 रुपयांचा स्टॉक 188 रुपयांवर, 3000 टक्के रिटर्न

लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. तेल काढण्याची ही प्रक्रिया सात ते दहा दिवसांत सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की गरज भासल्यास भारत आपल्या स्ट्रॅटेजिक रिझर्व्हमधून अधिक कच्चे तेल काढण्याचा निर्णय घेऊ शकतो.

Indian Army Recruitment 2021: विना परीक्षा लष्कर अधिकारी होऊन देशसेवेचे संधी

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असताना भारताने हा निर्णय घेतल्यास महाग असलेल्या पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होतील. भारताच्या पश्चिम आणि पूर्व दोन्ही किनारपट्टीवर मोक्याच्या तेलाचे साठे आहेत. त्यांची एकत्रित साठवण क्षमता सुमारे 3.8 कोटी बॅरल आहे.

First published:

Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price