मराठी बातम्या /बातम्या /मनी /Multibagger Stock : वर्षभरात अवघ्या 6 रुपयांचा स्टॉक 188 रुपयांवर, 3000 टक्के रिटर्न

Multibagger Stock : वर्षभरात अवघ्या 6 रुपयांचा स्टॉक 188 रुपयांवर, 3000 टक्के रिटर्न

JITF Infralogistics या मल्टीबॅगर पेनी स्टॉकच्या शेअरच्या किमतीची प्राईज हिस्ट्री (JITF Infralogistics Price History) पाहिली तर गेल्या एक महिन्यापासून या स्टॉकवर प्रॉफिट बुकिंगचा (Profit Booking) दबाव सुरु आहे. गेल्या 1 महिन्यात तो 261.50 रुपयांवरून 187.95 रुपयांपर्यंत खाली आला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 23 नोव्हेंबर : गेल्या एका वर्षात असे अनेक स्टॉक आहेत ज्यांनी 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. 2021 च्या मल्टीबॅगर स्टॉक्समध्ये (Multibagger Stock) केवळ लार्ज, मिड आणि स्मॉलकॅपचेच (Large cap, Midcap, Small Cap) वर्चस्व राहिले नाही तर काही पेनी स्टॉक्सचाही (Penny Stock) त्यात समावेश करण्यात आला आहे. JITF Infralogistics स्टॉक हा अशाच मल्टीबॅगर पेनी स्टॉकपैकी एक आहे. ज्याने गेल्या 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्कायंपेक्षा जास्त परतावा दिला आहे. खरंतर JITF Infralogistics हा असा स्टॉक आहे ज्याने गेल्या 1 वर्षात प्रति शेअर 6.05 ते 188 रुपये पर्यंत प्रवास केला आहे. या कालावधीत 3000 टक्के परतावा दिला आहे.

JITF Infralogistics या मल्टीबॅगर पेनी स्टॉकच्या शेअरच्या किमतीची प्राईज हिस्ट्री (JITF Infralogistics Price History) पाहिली तर गेल्या एक महिन्यापासून या स्टॉकवर प्रॉफिट बुकिंगचा (Profit Booking) दबाव सुरु आहे. गेल्या 1 महिन्यात तो 261.50 रुपयांवरून 187.95 रुपयांपर्यंत खाली आला आहे. या कालावधीत स्टॉकमध्ये सुमारे 28 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 11.85 रुपयांवरून.187.95 रुपयांपर्यंत वाढला आहे. गेल्या 6 महिन्यांत या स्टॉकमध्ये सुमारे 1500 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Indian Army Recruitment 2021: विना परीक्षा लष्कर अधिकारी होऊन देशसेवेचे संधी

यावर्षी आतापर्यंत हा स्टॉक 12.80 टक्क्यांवरून 187.95 रुपयांच्या पातळीवर आला आहे. 2021 मध्ये आतापर्यंत या स्टॉकमध्ये 1370 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे गेल्या 1 वर्षात हा शेअर 6.05 रुपयांवरून 187.95 रुपयांपर्यंत वाढला आहे. म्हणजेच या शेअरने या कालावधीत 3000 टक्के परतावा दिला आहे.

Indian Railway चा मोठा निर्णय; आता ट्रेनही भाड्याने घेता येणार, काय आहे योजना?

आता जर आपण JITF Infralogistics च्या या प्रवासाचे विश्लेषण केले तर जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर ते 72000 रुपयांपर्यंत खाली आले असते. दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये 6 महिन्यांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर ते 1 लाख ते 16 लाख रुपये झाले असते. तसेच जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2021 च्या सुरुवातीला या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये प्रति शेअर 12.80 रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये 14.7 लाख झाले असते. दुसरीकडे जर एखाद्या गुंतवणूकदाराने या स्टॉकमध्ये 1 वर्षापूर्वी 6.05 रुपये प्रति शेअर दराने 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि तो आतापर्यंत त्यात राहिला असेल तर त्याचे 1 लाख रुपये 31 लाख रुपये झाले असते.

First published:

Tags: Investment, Money, Share market