मराठी बातम्या /बातम्या /मनी /मास्टरकार्डवरील RBI च्या कारवाईनंतर या बँकेकडून ग्राहकांना दिलासा; लवकरच देणार VISA Credit Card

मास्टरकार्डवरील RBI च्या कारवाईनंतर या बँकेकडून ग्राहकांना दिलासा; लवकरच देणार VISA Credit Card

आरबीएल बँकेनं (RBL Bank) आपल्या ग्राहकांना व्हिसा कार्ड (Visa Card) देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

आरबीएल बँकेनं (RBL Bank) आपल्या ग्राहकांना व्हिसा कार्ड (Visa Card) देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

आरबीएल बँकेनं (RBL Bank) आपल्या ग्राहकांना व्हिसा कार्ड (Visa Card) देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

नवी दिल्ली 15 जुलै : भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) बुधवारी मास्टरकार्ड एशिया (Mastercard Asia) आणि पॅसिफिक प्रायव्हेट लिमिटेड (मास्टरकार्ड) यांच्याविरूद्ध कारवाई केल्यानंतर आरबीएल बँकेनं (RBL Bank) आपल्या ग्राहकांना व्हिसा कार्ड (Visa Card) देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. ही सेवा देण्याकरता बँकेनं गुरुवारी व्हिसा वर्ल्डवाइडबरोबर (Visa Worldwide) करार केला असून त्याद्वारे नवीन कार्डे देण्यात येणार आहेत. व्हिसा क्रेडिट कार्ड (Visa Credit Card) देण्यासाठी 8 ते 10 आठवड्यांचा कालावधी लागू शकतो, असं बँकेनं स्पष्ट केलं आहे.

आरबीएल बँक आतापर्यंत केवळ मास्टरकार्ड नेटवर्कवर क्रेडिट कार्ड जारी करत होती, परंतु मास्टरकार्डवर रिझर्व्ह बँकेनं कारवाई केल्यानं आता बँकेनं व्हिसा कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीएल बँकेचे सुमारे 30 लाख क्रेडिट कार्ड ग्राहक असून, क्रेडिट कार्ड बाजारपेठेतील अंदाजे 5 टक्के हिस्सा बँकेचा आहे. त्यामुळं आरबीएल बँक देशातील पाचव्या क्रमांकाची क्रेडिट कार्ड जारी करणारी बँक आहे. मास्टरकार्डच्या सहायानं बँक आतापर्यंत दरमहा साधारण एक लाख नवीन क्रेडिट कार्ड जारी करत होती. परंतु रिझर्व्ह बॅंकेच्या मास्टरकार्डवरील कारवाईनंतर बँकेच्या क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचं बँकेनं म्हटलं आहे.

मोदी सरकारच्या या योजनेतून खास Skill शिकून मिळवा रोजगार,कोट्यवधींनी घेतलाय फायदा

आरबीएल बँकेने भारतीय शेअर बाजारालाही (Stock Exchanges) ही माहिती दिली आहे. ‘मास्टरकार्ड नेटवर्कवर नवीन क्रेडिट कार्ड देण्याबाबत नियामक यंत्रणेचा निर्णय झाल्याखेरीज आणि व्हिसासह तांत्रिक सुविधांचे एकत्रीकरण पूर्ण होईपर्यंत आमच्या कार्ड देण्याच्या सध्याच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे. एका महिन्यात सुमारे एक लाख नवीन क्रेडिट कार्ड देण्याच्या कामास विलंब लागू शकतो.’ असं बँकेनं कळवलं आहे.

तुम्ही देखील सुरू करू शकता एटीएम, दरमहा होईल 50000 रुपयांची कमाई

भारतीय रिझर्व्ह बँकेची कारवाई : भारतीय रिझर्व्ह बँकेनं मास्टरकार्ड एशिया आणि पॅसिफिक प्रायव्हेट लिमिटेड (मास्टरकार्ड) यांच्याविरूद्ध कारवाई करत, 22 जुलै 2021 पासून मास्टरकार्डला आपल्या कार्ड नेटवर्कमध्ये नवीन रिटेल ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे. अमेरिकन एक्स्प्रेस बँकिंग कॉर्पोरेशन आणि डायनर्स क्लब इंटरनॅशनल नंतर स्थानिक डेटा स्टोअरेजच्या मुद्द्यांवरून रिझर्व्ह बँकेनं नवीन ग्राहक स्वीकारण्यास मनाई केलेली मास्टरकार्ड ही तिसरी कंपनी आहे. त्याचा फटका आरबीएल बँकेला बसला आहे. अखेर बँकेनं व्हिसा कार्ड सेवेशी करार करून यावर तोडगा काढला आहे. मात्र तंत्रज्ञान सेवेची पूर्तता होईपर्यंत कार्ड देण्याच्या सेवेवर परिणाम होणार आहे. त्यामुळं ग्राहकांना काही काळ वाट पहावी लागण्याची शक्यता आहे.

First published:
top videos

    Tags: Credit card, Rbi, Visa