भारतीय रुपया 'या' मुस्लीम देशातही चालणार

भारतीय रुपया 'या' मुस्लीम देशातही चालणार

Dubai, Indian Rupee - परदेशात जायचं असलं तर तिथली करन्सी घ्यावी लागते. पण आता आपला रुपया एका मुस्लीम देशात चालतोय.

  • Share this:

मुंबई, 04 जुलै : आता भारतीय रुपया एका मुस्लीम देशात चालणार आहे. तो देश आहे दुबई. युनायटेड अरब अमिरात या वर्तमानपत्रात आलेल्या बातमीनुसार दुबईच्या सर्व विमानतळांवर भारतीय रुपया चालणार आहे.

भारतीय रुपया दुबईला चालणं ही पर्यटकांसाठी खूप चांगली बातमी आहे. कारण एक्झचेंज दरामुळे त्यांचं नुकसान होत होतं.

गल्फ न्यूजनं दिलेल्या बातमीनुसार भारतीय रुपया आता दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अल मॅक्टोम विमानतळ इथे चालणार आहे. तिथे तो स्वीकारला जाणार आहे.

देशाची अर्थव्यवस्था कशी आहे? सरकारनं सादर केला इकाॅनाॅमिक्स सर्वे

दुबईला ड्युटी फ्री इथल्या एका कर्मचाऱ्यानं सांगितलं की, आता इथे खरेदी करताना भारताचा 1 रुपया स्वीकारला जाईल.

दुबईत जाणाऱ्या भारतीयांची संख्या खूप आहे. गेल्या वर्षी 9 कोटी पर्यटक दुबई विमानतळावरून गेले. त्यातले 1 कोटी 22 लाख भारतीय होते. पूर्वी पर्यटकांना दुबईला जाताना चलन बदलावं लागायचं. रुपयाला कनव्हर्ट करून डाॅलर, दिऱ्हाम किंवा युरोमध्ये करावं लागायचं. मगच ते दुबईच्या ड्युटी फ्री शाॅपमध्ये खरेदी करता यायची.

मोदी सरकारच्या 'या' सीक्रेट टीमनं तयार केलंय बजेट

दुबई ड्युटी फ्री दुकांनांमध्ये परदेशी चलन स्वीकारलं जातं. त्यात रुपयाचा आता 16वा नंबर लागलाय. 1983च्या डिसेंबरपासून ही परदेशी करन्सी स्वीकारणं सुरू झालं होतं. रुपयाला मान्यता आता मिळाली, ही पर्यटकांसाठी चांगली गोष्ट आहे.

Union Budget 2019 : 5 जुलैला मोदी सरकारपुढे असतील ही 5 आव्हानं

भारतातून दुबईत फिरायला अनेक भारतीय जात असतात. विमानतळावर शाॅपिंग करणं हा अनेकांचा छंद असतो आणि ते सोयीचंही फिरतं. ड्युटी फ्री दुकानांमध्ये खरेदी केली की त्यावर ड्युटी बसत नाही. विमानतळावर कनव्हर्ट करायची सोय असतेच. पण आता रुपया तिथे स्वीकारला जाणार ही चांगली घटना आहे.

VIDEO: पावागड परिसरात मुसळधार पाऊस, पर्यटकांना मोठा त्रास

First published: July 4, 2019, 4:17 PM IST

ताज्या बातम्या