मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Debit, Credit Card : डेबिड कार्ड, क्रेडिट कार्डवर खरेदीसह विमा कव्हरचीही सुविधा उपलब्ध

Debit, Credit Card : डेबिड कार्ड, क्रेडिट कार्डवर खरेदीसह विमा कव्हरचीही सुविधा उपलब्ध

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (National Payment Corporation India) RuPay डेबिट कार्डधारकांसाठी वैयक्तिक अपघात विमा संरक्षण देखील देते. RuPay कार्डधारकाचा अपघाती मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आल्यास अपघाती विमा दिला जातो.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 6 नोव्हेंबर : लोक क्रेडिट, डेबिट कार्ड (Credit card, Debit Card) आणि बँकांद्वारे जारी केलेल्या इतर ऑनलाइन पेमेंट (Online Payment) पद्धतींद्वारे भरपूर खरेदी करतात. यामुळे रोख रक्कम घेऊन जाण्याची कोणतीही कटकट नाही. परंतु बहुतेक कार्डधारकांना त्याचे सर्व फायदे माहित नाहीत. विशेषत: या कार्डवर बँका कार्डधारकांना जे मोफत विमा संरक्षण देतात. बँक आणि कार्डच्या प्रकारानुसार ते बदलते. उदाहरणार्थ, देशातील सर्वात मोठी बँक SBI त्यांच्या डेबिट कार्डवर 20 लाख रुपयांपर्यंतचा पर्सनल अॅक्सिडंट इन्शुरन्स, 2 लाख रुपयांपर्यंत परचेस प्रोडक्शन कव्हर आणि 50,000 रुपयांपर्यंत अॅड-ऑन कव्हर ऑफर करते. बँकांमध्ये जमा केलेल्या एफडीवर दिलेल्या विम्याबाबत ग्राहकांनाही माहिती नसते.

2 लाख रुपयांचे विमा संरक्षण

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (National Payment Corporation India) RuPay डेबिट कार्डधारकांसाठी वैयक्तिक अपघात विमा संरक्षण देखील देते. RuPay कार्डधारकाचा अपघाती मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आल्यास अपघाती विमा दिला जातो. या पॉलिसी अंतर्गत, RuPay क्लासिक कार्डधारकांना 1 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते, तर प्लॅटिनम कार्डधारकांना 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. सामान्य मृत्यूच्या बाबतीत या पॉलिसीचा लाभ मिळत नाही.

FD वर टर्म इन्सुरन्स

एचडीएफसी बँकेने आता एफडीवर टर्म लाईफ इन्शुरन्सचा लाभ देण्यास सुरुवात केली आहे. जर 18 ते 50 वर्षे वयोगटातील एखाद्या व्यक्तीने 2 ते 10 लाखांची एफडी केली तर त्याला त्याच रकमेसाठी एक वर्षासाठी मुदतीचा विमा देखील मिळतो.

FD Interest Rates : SBI सह 'या' तीन बँकांकडून FD वर आकर्षक व्याजदर, वाचा सविस्तर

डेबिट कार्डवर करोडोंचा विमा

डेबिट कार्डवर अनेक फायदे दिले जातात. उदाहरणार्थ, एचडीएफसी प्लॅटिनम कार्डमध्ये रेल्वे, रस्ते आणि विमान कंपन्यांकडून अपघात झाल्यास 5 लाख रुपयांचे सुरक्षा कवच आहे आणि त्याच कार्डने तिकीट बुक केल्यास आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान 1 कोटी रुपयांचा अपघाती विमा आहे. एचडीएफसीच्या जेट प्रिव्हिलेज एचडीएफसी डेबिट कार्ड, टाइम्स पॉइंट, मिलेनिया डेबिट आणि रुपे डेबिट, बिझनेस डेबिट आणि रिवॉर्ड्स, गोल्ड डेबिट कार्डवर असेच फायदे उपलब्ध आहेत.

महागड्या क्रेडिट कार्डवरील सुविधाही मोठ्या

क्रेडिट कार्ड लोकप्रिय करण्यासाठी बँकांनी अनेक फायदे देण्यास सुरुवात केली आहे. मात्र हे फायदे फक्त जास्त रक्कम असलेल्या कार्डांवरच उपलब्ध आहेत. जसं की एचडीएफसी डायनर्स ब्लॅक कार्डवर दोन कोटींपर्यंतचा हवाई अपघात विमा दिला जातो.

एका वर्षात 1 लाखाचे झाले 18 लाख, ₹4 चा शेअर पोहोचला 75 रुपयांवर; तुमच्याकडे आहे का हा Stock?

या गोष्टी लक्षात ठेवा

कार्ड वापरत राहणे आवश्यक आहे, जर आर्थिक व्यवहार निर्धारित वेळेपेक्षा जास्त झाला तर दावा वैध ठरणार नाही. कार्डधारकाचा अपघातात मृत्यू झाल्यास विमा कंपनीला लवकरात लवकर माहिती व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत.

First published:

Tags: Insurance, Investment, Share market