मराठी बातम्या /बातम्या /मनी /

FD Interest Rates : SBI सह 'या' तीन बँकांकडून FD वर आकर्षक व्याजदर, वाचा सविस्तर

FD Interest Rates : SBI सह 'या' तीन बँकांकडून FD वर आकर्षक व्याजदर, वाचा सविस्तर

Fix Deposit मध्ये पैसे टाकायचे तर कुठे टाकयचे, कारण सध्या अनेक बँका उपलब्ध आहेत. त्यामुळे FD योजना निवडण्यापूर्वी वेगवेगळ्या बँकांच्या ऑफर (Bank Offers) आणि त्यांचे सध्याचे व्याजदर निश्चितपणे तपासले पाहिजेत.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 6 नोव्हेंबर : आपल्या कमाईतून काही भाग बचत (Saving) करणे कधीही फायदेशीर असतं. भविष्य सुरक्षित करण्यासाठी बचत महत्त्वाची आहे. बचतीमुळे अचानक होणाऱ्या खर्चाचा सामना करणे आपल्यासाठी सोपे होते. पण बचत करताना योग्य ठिकाणी गुंतवणूक (Investment Options) देखील तितकीच महत्त्वाची आहे. फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) हा गुंतवणुकीचा सर्वात सोपा आणि सुरक्षित पर्याय आहे. मात्र फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे टाकायचे तर कुठे टाकयचे, कारण सध्या अनेक बँका उपलब्ध आहेत. त्यामुळे एफडी योजना निवडण्यापूर्वी वेगवेगळ्या बँकांच्या ऑफर (Bank Offers) आणि त्यांचे सध्याचे व्याजदर निश्चितपणे तपासले पाहिजेत. जास्तीत जास्त रिटर्नसाठी याची मदत होईल. तर फिक्स डिपॉझिटवर चांगला व्याजदर देणाऱ्या बँकांवर एक नजर टाकूया.

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India)

स्टेट बँक ऑफ इंडिया देशातील सर्वात मोठी बँक आपल्या ग्राहकांना FD खात्यांवर अतिशय आकर्षक व्याजदर ऑफर करते. SBI च्या वेबसाइटनुसार, तुम्ही तुमचे पैसे 3 वर्षांसाठी मुदत ठेवींमध्ये ठेवल्यास, तुम्हाला त्यावर 5 टक्के व्याजदराचा लाभ मिळेल. त्याच वेळी, जर तुम्ही 5 वर्षांसाठी पैसे जमा केले तर तुम्हाला 10 टक्के व्याजदराचा लाभ मिळेल. तर, 5 वर्षांपेक्षा जास्त काळ ठेवींवर 15 टक्के व्याजदर आहे.

येस बँक (Yes Bank)

खासगी बँकेत गुंतवणूक करायची असल्यास येस बँक उत्तम पर्यात आहे. येस बँकेच्या FD योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला चांगल्या व्याजदराचा लाभ मिळू शकतो. यामध्ये तुम्ही तुमचे पैसे 6 महिने ते 9 महिने गुंतवल्यास तुम्हाला 5 टक्के व्याजदराचा लाभ मिळेल. त्याच वेळी, जर तुम्ही 9 महिने ते 1 वर्षापर्यंत पैसे गुंतवले तर तुम्हाला 5.25 टक्के व्याजदराचा लाभ मिळेल. या गुंतवणुकीअंतर्गत 1 वर्ष ते 3 वर्षांपर्यंत 6 टक्के व्याजदर, तर 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक केली तर 6.25 टक्के व्याजदराचा लाभ मिळेल.

इंडसइंड बँक (IndusInd Bank)

इंडसइंड बँकेच्या FD योजनेंतर्गत, जर तुम्ही 1 वर्ष ते 2 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला त्यावर 6 टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल. तर 2 वर्ष ते 3 वर्षांच्या गुंतवणुकीवर ही बँक आपल्या ग्राहकांना 6.50 टक्के व्याजदर देते.

First published:

Tags: Investment, Money, बँक