आता पैसे भरण्यासाठी जावं लागणार नाही बँकेत, असा असेल हा नवा कॅश काउंटर

आता पैसे भरण्यासाठी जावं लागणार नाही बँकेत, असा असेल हा नवा कॅश काउंटर

हे नेटवर्क अस्तित्वात आलं तर सामान्य लोकांना बँकेत कॅश डिपॉझिट करण्यासाठी जावं लागणार नाही. समजा तुमचं जर HDFC बँकेत खातं असेल तरी या सुविधेमुळे तुम्ही SBI च्या मदतीने तुमच्या खात्यात पैसे भरू शकता.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जानेवारी : युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI)नुसार बँकिंग पेमेंटची सेवा सुरू केल्यानंतर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)बँकांसाठी ATM च्या माध्यमातून कॅश डिपॉझिट (Cash Deposit in ATM)ची सेवा सुरू करण्याची तयारी करतंय. NPCI च्या मते, नॅशनल फायनान्शिअल स्विचच्या माध्यमातून कॅश डिपॉझिटची सेवा सुरू होणार आहे.

करन्सीच्या व्यवस्थापनात सूट

यामध्ये ATM ऑपरेटर्सना ATM मधल्या पैशांचं व्यवस्थापन करता येईल. तसंच सारखेसारखे बँकेच पैसे जमा करण्यातूही सुटका होईल. कॅश डिपॉझिटच्या सुविधेनंतर ग्राहक ही यंत्रणा पैसे काढण्यासाठीही वापरू शकतात. यामुळे ATM मध्ये कॅश भरण्याची चिंता उरणार नाही.

सगळ्या बँकांना नेटवर्कने जोडणार

एका खाजगी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, सगळ्या खाजगी आणि सार्वजनिक बँकांना इंटरऑपरेबल नेटवर्कमध्ये जोडलं जाणार आहे. असं असलं तरी याला होकार देण्याआधी बँकांना काही गोष्टींचा विचार करावा लागेल. याच्या अमलबजावणीत बनावट नोटांचं आव्हान आहे.

(हेही वाचा : Government Job : RBI मध्ये नोकरीच्या संधी, या तारखेआधी करा अर्ज)

30 हजार ATM अपडेट होणार

सध्याच्या काळात 14 बँका इंटरऑपरेबल कॅश डिपॉझिट नेटवर्क वापरतात. सगळ्या प्रमुख बँकांचे सुमारे 30 हजार ATM तात्काळ अपडेट केले जाऊ शकतात.

हे नेटवर्क कसं काम करेल?

हे नेटवर्क अस्तित्वात आलं तर सामान्य लोकांना बँकेत कॅश डिपॉझिट करण्यासाठी जावं लागणार नाही. तुमचं जर HDFC बँकेत खातं असेल तरी या सुविधेमुळे तुम्ही SBI च्या मदतीने तुमच्या खात्यात पैसे भरू शकता.

(हेही वाचा : आता 5 दिवसांत सुरू करू शकता कोणताही बिझनेस, मोदी सरकार करणार हे बदल)

या बँका देतात ही सुविधा

सध्या यूनियन बँक, कॅनरा बँक, आंध्रा बँक आणि साउथ इंडियन बँक या सुविधा देते. ही सुविधा PMC बँकही देत होती पण आर्थिक गैरव्यवहारांमुळे रिझर्व्ह बँकेने या बँकेवर निर्बंध घातले आहेत. सध्या 10 हजार रुपयांच्या कॅश डिपॉझिटसाठी 25 रुपये द्यावे लागतात. यापेक्षा अधिक रक्कम असेल तर 50 रुपये प्रोसेसिंग फी लागते.

=========================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ATMmoney
First Published: Jan 11, 2020 04:24 PM IST

ताज्या बातम्या