आता 5 दिवसांत सुरू करू शकता कोणताही बिझनेस, मोदी सरकार करणार हे बदल

आता 5 दिवसांत सुरू करू शकता कोणताही बिझनेस, मोदी सरकार करणार हे बदल

तुम्हाला नवा बिझनेस सुरू करायचा असेल तर आता जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही फक्त 5 दिवसांत तुमचा बिझनेस सुरू करू शकता. यासाठी सरकार काही नियमांत बदल करणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 जानेवारी : तुम्हाला नवा बिझनेस सुरू करायचा असेल तर आता जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही फक्त 5 दिवसांत तुमचा बिझनेस सुरू करू शकता. यासाठी सरकार काही नियमांत बदल करणार आहे. त्यामुळे 18 दिवसांच्या ऐवजी 5 दिवसांत तुमचं काम होऊ शकेल.

हे 2 फॉर्म भरून होईल काम

नावाची नोंदणी, GST साठी नोंदणी अशी कामं केवळ 2 फॉर्म भरून पूर्ण होतील. सध्या यासाठी बरेच फॉर्म भरावे लागतात. या महिन्यातच कॉर्पोरेट मंत्रालय हे दोन फॉर्म जारी करेल. Spice Plus आणि Agile Pro अशी या फॉर्मची नावं आहेत. यामध्ये सगळी माहिती भरायची आहे.

नोंदणीची प्रक्रिया अगदी सोपी

इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टमध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हे नवे फॉर्म वेबवर आधारित असतील आणि पहिल्यापेक्षा सोपेही असतील. Spice Plus फॉर्मच्या मदतीने तुम्ही तुमचं नाव आणि इनकॉर्पोरेशनबद्दल माहिती देऊ शकाल.

(हेही वाचा : KYC करण्यासाठी आता जावं लागणार नाही बँकेत, RBI ने बदलला सगळ्यात मोठा नियम)

वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टनंतर निर्णय

एन्प्लॉयी स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ESIC)आणि कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) यासोबतच इनकॉर्पोरेशनच्या वेळी नोंदणी करावी लागेल. डायरेक्ट आयडेंटिफिकेशन नंबर (DIN) आणि प्रोफेशनल टॅक्ससाठी नोंदणीसोबत पॅन, टॅक्स सवलत या सगळ्याची नोंदणी करणं सोपं होईल.

वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. भारतात नवा बिझनेस सुरू करायचा असेल तर 18 फॉर्म भरावे लागतात, असं वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले.

=====================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: January 10, 2020, 5:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading