बचत खातेधारकांसाठी खूशखबर! आता खात्यात पैसे नसले तरी नो टेन्शन

बचत खातेधारकांसाठी खूशखबर! आता खात्यात पैसे नसले तरी नो टेन्शन

देशात कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध घोषणा केल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 मार्च :  देशात कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध घोषणा केल्या आहेत. त्यांनी सेव्हिंग बँक खात्यासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. बचत खात्यामध्ये किमान शिल्लक (Minimum Balance) नसली तरी कोणतही शुल्क आकारण्यात येणार नाही आहे.  म्हणजेच, बँक खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अर्थमंत्र्यांनी माध्यमांना संबोधित केले. या वेळी अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर देखील त्यांच्यासमवेत उपस्थित होते. सीतारामन यांनी माध्यमांना इंग्रजीत संबोधित केल्यानंतर अनुराग ठाकूर यांनी त्यांनी केलेल्या घोषणा हिंदीमध्ये सांगितल्या.

(हे वाचा-आता दुसऱ्या बँकेच्या ATMमधून पैसे काढण्यासाठी नाही द्यावा लागणार कोणताही चार्ज

सर्वसामान्यासाठी केंद्रसरकारकडून विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. अनुराग ठाकुर यांनी सांगितले की, इनसॉल्व्हन्सी आणि बँक्रप्टसी कोड डिफॉल्ट लिमिट वाढवून 1 लाखांपासून 1 कोटी करण्यात आली आहे. इकॉनॉमिक पॅकेजवर काम चालू असून लवकरच त्याबाबत घोषणा करण्यात येईल अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी SBI ने सुद्धा ग्राहकांसाठी घेतला होता हा निर्णय

स्टेट बँक ऑफ इंडियाने खातेधारकांसाठी मोठी घोषणा केली होती. सर्व बचत खातेधारकांना सरासरी मिनिमम बॅलन्स ठेवण्याचा नियम रद्द करण्याचा निर्णय SBI कडून घेण्यात आला. यामुळे बँकेच्या सर्व बचत खातेधारकांना झिरो बॅलन्स खात्याची सेवा मिळाली.

(हे वाचा-पुन्हा वाढवली पॅन आणि आधार लिंक करण्याची तारीख, जाणून घ्या काय आहे नवीन डेडलाइन)

एसबीआयच्या 44.51 कोटी बचत खातेधारकांसाठी सरासरी मंथली मिनिमम बॅलन्स ठेवण्याची अट रद्द केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 24, 2020 05:44 PM IST

ताज्या बातम्या