नवी दिल्ली, 24 मार्च : आधार कार्ड (Aadhar Card) आणि पॅन (Permanent Account Number PAN) लिंक करण्याची तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT) पॅन-आधार लिंकिंगची डेडलाइन वाढवून आता 30 जूनपर्यंत मुदत देऊ केली आहे. दोन्ही दस्ताऐवज जोडण्याची तारीख 31 मार्चपर्यंत होती. दरम्यान यामध्ये आता बदल करण्यात आला असून सरकारकडून आता नवव्यांदा हा अवधी वाढवण्यात आला आहे.
Aadhaar - pan linking date to be extended to June 30, 2020: Finance Minister #Breaking pic.twitter.com/VriyuJVyFT
— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) March 24, 2020
इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्यासाठीसुद्धा आधार-पॅन लिंकिंग बंधनकारक आहे. त्यामुळे तुमच्या कामाचा खोळंबा थांबवायचा असेल तर आधार-पॅन लिंक करणं आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी आयकर विभागाकडून इशारा देण्यात आला होता की, पॅन-आधार लिंक न केल्यास पॅनकार्ड रद् करण्यात येईल. मात्र आता ही तारीख आता वाढवण्यात आल्याने ज्यांनी हे काम पूर्ण केले नाही आहे, त्यांना दिलासा मिळाला आहे. आधार-पॅन लिंकिंग कसं कराल? -आधार पॅन लिंकिंगसाठी incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर जा. -तिथं तुम्हाला आधार लिंकचा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर CLICK HERE या पर्यायावर क्लिक करून माहिती द्या. -तुम्हाला आधार-पॅन लिंक आहे किंवा नाही याची माहिती मिळेल. लिंकिंग झालं नसेल तर तुमचा पॅन नंबर, आधार नंबर, नाव आणि कॅप्चा दिल्यानंतर ‘लिंक आधार’ पर्यायावर क्लिक करा.तुमचे आधार पॅन कार्ड लिंकिंग होऊन जाईल. (हे वाचा- गरिबांसाठी खाजगी रुग्णालयात कोरोनाची मोफत तपासणी, मोदी सरकार राबवणार विशेष योजना ) -‘View Link Aadhaar Status’ वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक झालं आहे की नाही ते समजेल -याची माहिती तुम्हाला 567678 किंवा 56161 यावर एसएमएस पाठवूनही मिळवता येते. -UIDPAN<आधार क्रमांक><पॅन क्रमांक> हा मेसेज वर दिलेल्या क्रमांकावर पाठवाला लागेल. त्यानंतर तुम्हाला आधार पॅन लिंक झाले की नाही हे समजेल.