Home /News /money /

अर्थमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा, दुसऱ्या बँकेच्या ATMमधून पैसे काढण्यासाठी नाही द्यावा लागणार कोणताही चार्ज

अर्थमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा, दुसऱ्या बँकेच्या ATMमधून पैसे काढण्यासाठी नाही द्यावा लागणार कोणताही चार्ज

New Delhi: Union Finance Minister Nirmala Sitharaman chairs a pre-budget meeting with industrialists, at Finance Ministry in New Delhi, Thursday, Dec. 19, 2019. (PTI Photo/Subhav Shukla)(PTI12_19_2019_000086B)

New Delhi: Union Finance Minister Nirmala Sitharaman chairs a pre-budget meeting with industrialists, at Finance Ministry in New Delhi, Thursday, Dec. 19, 2019. (PTI Photo/Subhav Shukla)(PTI12_19_2019_000086B)

देशामध्ये फोफावणाऱ्या कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता, आर्थिक बाजू सावरण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

    वी दिल्ली, 24 मार्च : कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या परिणाम सर्व देशांच्या अर्थव्यवस्थेवर झाले आहेत. अर्थ मंत्री (Finance Minister) निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2018-19 साठी इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची डेडलाइन 30 जून 2020 पर्यंत वाढवली आहे. त्याचबरोबर 30 जूनपर्यंत डिलेड पेमेंटवरील व्याजदर 12 टक्क्यांवरून 9 टक्के करण्यात आला आहे. तसंच टीडीएसच्या डिपॉझिटसाठी व्याजदर 18 टक्क्यावरून 9 टक्के करण्यात आला आहे. (हे वाचा-गरिबांसाठी खाजगी रुग्णालयात कोरोनाची मोफत तपासणी, मोदी सरकार राबवणार विशेष योजना) टीडीएस फाइलिंगसाठी शेवटची तारीख 30 जून 2020 असेल. अर्थमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या घोषणा केल्या आहेत. याव्यतिरिक्त काही महत्त्वाच्या घोषणा निर्मला सीतारामन यांनी केल्या आहेत. पॅन-आधार लिंक करण्याची मुदत वाढवली आधार कार्ड (Aadhar Card) आणि पॅन (Permanent Account Number PAN) लिंक करण्याची तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT) पॅन-आधार लिंकिंगची डेडलाइन वाढवून आता 30 जूनपर्यंत मुदत देऊ केली आहे. दोन्ही दस्ताऐवज जोडण्याची तारीख 31 मार्चपर्यंत होती. दरम्यान यामध्ये आता बदल करण्यात आला असून सरकारकडून आता नवव्यांदा हा अवधी वाढवण्यात आला आहे. 3 महिन्यापर्यंत एटीएममधून पैसे काढण्यासाठी कोणताही चार्ज नाही निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की,  3 महिन्यापर्यंत तुमच्या डेबिट कार्डमधून दुसऱ्या बँकांच्या  ATM मधून  पैसे काढण्यासाठी कोणतंह शुल्क आकारण्यात येणार नाही आहे. त्याचप्रमाणे बँकेमध्ये मिनिमम बँक बॅलेन्स ठेवणही बंधनकारक नाही आहे. त्यावर आकारण्यात येणारे शुल्कही रद्द करण्यात आले आहे. हे वाचा- Coronavirus मुळे अर्थमंत्र्यांनी केल्या महत्त्वाच्या घोषणा; करदात्यांना दिलासा) याआधी काही बँकांच्या नियमानुसार इतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास ठराविक रक्कम शुल्क म्हणून द्यावी लागत होती. मात्र आता यासंदर्भात सूट देण्यात आली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या