Home /News /money /

LPG Gas Cylinder: सब्सिडीबाबत काय आहे सरकारचा प्लॅन?

LPG Gas Cylinder: सब्सिडीबाबत काय आहे सरकारचा प्लॅन?

सरकारचा आर्थिक वर्ष 2021 दरम्यान सब्सिडीवरचा खर्च 3,559 रुपये कोटी होता. त्यानंतर 2020 मध्ये हा खर्च 24,468 कोटी रुपये होता. जानेवारी 2015 मध्ये सब्सिडीची सुरुवात करण्यात आली होती.

  नवी दिल्ली, 19 मार्च : घरगुती गॅस सिलेंडरच्या सब्सिडीबाबत ग्राहकांना मोठी बातमी मिळू शकते. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान क्रूड ऑइलच्या किमी वाढल्या आहेत. याचदरम्यान घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीही 1000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात असा अंदाज वर्जवण्यात येत आहे. सरकारकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु असे संकेत आहेत. सरकारच्या अंतर्गत मूल्यांकनात ग्राहकाला एका सिलेंडरसाठी 1000 रुपये द्यावे लागू शकतात असं दिसून आलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एलपीजी सिलेंडरबाबत सरकार दोन गोष्टी करू शकते. सरकार विना सब्सिडी सिलेंडर सप्लाय करू शकतं किंवा दुसरं काही निवडक ग्राहकांना सब्सिडीचा लाभ दिला जाऊ शकतो. सब्सिडीवर काय आहे सरकारचा प्लॅन - सब्सिडीबाबत सरकारने अद्याप कोणतीही स्पष्टता दिलेली नाही. परंतु मिळालेल्या माहितीनुसार, 10 लाख रुपये इन्कम नियम लागू ठेवला जाईल आणि उज्ज्वला योजनेच्या लाभार्थिंना सब्सिडीचा लाभ मिळेल. इतर लोकांची सब्सिडी संपू शकते. सरकारचा आर्थिक वर्ष 2021 दरम्यान सब्सिडीवरचा खर्च 3,559 रुपये कोटी होता. त्यानंतर 2020 मध्ये हा खर्च 24,468 कोटी रुपये होता. जानेवारी 2015 मध्ये सब्सिडीची सुरुवात करण्यात आली होती. या सब्सिडीमध्ये ग्राहकांना विना सब्सिडी एलपीजी सिलेंडरचे पैसे भरावे लागत होते. त्यानंतर सरकारकडून सब्सिडीचे पैसे ग्राहकांच्या बँक खात्यात रिफंड केलं जात होतं.

  हे वाचा - महिन्याला 10 हजार भरा आणि 16 लाख रुपये मिळवा,जाणून घ्या काय ही सुरक्षित गुंतवणूक

  गॅस सिलेंडरचा दर सतत वाढतो आहे. मागील वर्षी 2021 मध्ये गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. मुंबईत घरगुती गॅसचा दर 899.50 रुपये आहे. तेल कंपन्यांनी कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात या महिन्यात वाढ केली. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइलने 19 किलोग्रॅम कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत 105 रुपयांची वाढ केली आहे. या वाढीनंतर नवी दिल्लीत 19 किलोग्रॅम गॅस सिलेंडरचा नवा दर 2012 रुपये झाला आहे. या महिन्यात घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ झालेली नाही. मागील महिन्यातही घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात बदल करण्यात आले नव्हते.

  हे वाचा - Home Loan ओव्हरड्राफ्ट सुविधा काय आहे? यामुळे काय फायदा होतो?

  इथे तपासा LPG Gas Cylinder चा दर - घरगुती गॅस सिलेंडरचा दर तपासण्यासाठी सरकारी तेल कंपनी IOC च्या वेबसाइटवर जावं लागेल. इथे कंपन्या दर महिन्याला नवे दर जारी करते. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर तुम्ही शहरातील सिलेंडरचा दर तपासू शकता.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: LPG Price, Subsidy

  पुढील बातम्या