नवी दिल्ली, 19 मार्च : पैशांची बचत (Savings) आणि गुंतवणूक (Investment) ही काळाची गरज आहे. त्यासाठी विविध बँका, पतसंस्था आणि पोस्ट ऑफिसमध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. गुंतवणुकीच्या या पर्यायांपैकी पतसंस्थांच्या तुलनेत राष्ट्रीयकृत बँका (Nationalized Banks) आणि पोस्ट ऑफिसचा पर्याय सर्वांत सुरक्षित ठरतो. कारण, आपल्या देशामध्ये आजही सर्वात जास्त लोकसंख्या ही आर्थिकदृष्ट्या मध्यम वर्गामध्ये (Middle Class) मोडते. परिणामी आपल्या कष्टाच्या पैशांची सर्वात जास्त सुरक्षित गुंतवणूक (Less Risk Investment) कशी होईल, याकडे सर्वांत जास्त लक्ष दिलं जातं. एकूणच ज्या ठिकाणी पैसे सुरक्षित राहतील आणि रिटर्न्सदेखील जास्त मिळतील, अशा ठिकाणी गुंतवणूक करण्यावर भर दिला जातो. स्टॉक मार्केट (Stock Market) आणि क्रिप्टोकरन्सीमधील (Cryptocurrencies) गुंतवणुकीतील अस्थिरतेपासून दूर राहण्याासठी आजही अनेक लोक पोस्ट ऑफिसच्या स्कीम्सवर (Post Office Scheme) विश्वास ठेवतात. पोस्ट ऑफिसदेखील आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी वेगवेगळ्या योजना घेऊन येत असतं. या स्कीम्स मार्केट रिस्कपासून वेगळ्या आहेत आणि त्यातून चांगले रिटर्न्सही (Good Return Investment) मिळतात. इंडियन पोस्ट डिपार्टमेंटनं (Indian Post) ऑफर केलेल्या अनेक बचत योजनांना, देशातील सर्वात लोकप्रिय जोखीम-मुक्त (Risk Free) बचत योजना मानलं जात आहे. निश्चित आणि चांगला व्याजदर (Good Interest Rates) असलेल्या स्कीम्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी भारतातील मध्यमवर्गीय नागरिक पोस्ट ऑफिस स्कीम्सला सर्वोच्च प्राधान्य देत आहेत. सरकारी विभाग असलेलं पोस्ट ऑफिस लोकांना चांगले रिटर्न्स देण्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. मुदत ठेवी (Fixed Deposits) किंवा बचत खात्यांमध्ये (Savings Accounts) गुंतवणूक करण्यासाठी बँकेला प्राधान्य दिलं जातं. तर, रिकरिंग डिपॉझिट्साठी (Post Office Recurring Deposit Account) आजही पोस्ट ऑफिस बचत योजनांना हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो.
हे वाचा - Investment Tips: मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणुकीदरम्यान ‘या’ चुका टाळा
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजना काय आहे? पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट या गुंतवणूक पद्धतीद्वारे, तुमचे पैसे आणि मिळालेलं व्याज दोन्हीही सुरक्षित असतं. यामध्ये कमी रिस्कसह चांगले रिटर्न्ससही (Returns) मिळतात. एखाद्या व्यक्तीला कमी रक्कमेची गुंतवणूक करून जर चांगले रिटर्न्स मिळवायचे असतील तर पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट खातं उघडणं हा एक चांगला मार्ग आहे. असे आहेत पोस्ट ऑफिस आरडीचे व्याज दर - पोस्ट ऑफिस आरडीमध्ये बँकांच्या तुलनेत चांगले व्याज दर (Interest Rates) मिळतात. 100 रुपये या किमान रकमेसह तुम्ही या स्कीममध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकता. विशेष म्हणजे कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा लावलेली नाही. याचाच अर्थ तुम्ही तुम्हाला पाहिजे तितकी रक्कम आरडीमध्ये (RD) जमा करू शकता. चांगल्या व्याजदरामुळे पोस्ट ऑफिसची आरडी स्कीम खूप लोकप्रिय आहे. आरडी स्कीममध्ये 5.8 टक्के व्याजदर मिळतो. सरकारनं 1 एप्रिल 2020 पासून हा व्याजदर लागू केलेला आहे. केंद्र सरकार प्रत्येक तिमाहीत त्यांच्या लहान बचत योजनांचे (Small Savings Schemes) व्याजदर निश्चित करत असतं. पोस्ट ऑफिस आरडीमधून मिळू शकतात 16 लाख रुपये - RD स्कीम्समधील गुंतवणुकीची परिणामकारकता इतर स्कीम्सच्या तुलनेत फारच जास्त आहे. जर तुम्ही सध्याच्या 5.8 टक्के व्याज दरानं प्रत्येक महिन्याला आरडीमध्ये 10 हजार रुपये गुंतवले, तर 10 वर्षांच्या कालावधीत तुम्हाला 16 लाख रुपये रिटर्न मिळतील. पोस्ट ऑफिस आरडीमध्ये चक्रवाढ (Compound Interest) पद्धतीने दर तिमाहीत व्याज मोजलं जातं. त्यातून गुंतवणूकदारांना सातत्यानं उत्पन्न मिळवण्यास मदत होते. त्यामुळेच ही स्कीम जास्त प्रभावी ठरते.
हे वाचा - जगातील टॉप-10 श्रीमंतांमध्ये Reliance चे मुकेश अंबानी एकमेव भारतीय
पोस्ट ऑफिस आरडीची वैशिष्ट्यं - जर काही कारणास्तव तुमचा मासिक हप्ता चुकला तर तुम्हाला एकूण रकमेच्या एक टक्का दंडाची (Penalty) रक्कम भरावी लागेल. जर तुम्ही सलग चार महिने हप्ते भरले नाहीत तर तुमचं खातं आपोआप बंद होईल. डीफॉल्ट तारखेपासून (Default Date) दोन महिन्यांच्या आत तुम्ही तुमचं खातं पुन्हा सुरू (Retrieve) करू शकता. पण, तुम्ही हीदेखील मुदत चुकवली तर खातं कायमस्वरूपी बंद (Permanently Closed) केलं जाईल. विशेष म्हणजे, पोस्ट ऑफिस आरडी खातं उघडल्यानंतर एका वर्षात खातेदारांना त्यांच्या ठेवीतील 50 टक्के रक्कम काढण्याची परवानगी आहे. त्यामुळे एखाद्या आर्थिक संकटाच्या काळातदेखील ही स्कीम उपयुक्त ठरू शकते. शिवाय, बँकातील व्याजदरांचा विचार केला तर सध्या व्याजदर खूप कमी झालेले आहेत. अशा स्थितीमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये पैसे गुंतवले तर तुमचा जास्त आर्थिक फायदा होऊ शकतो.