जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Home Loan ओव्हरड्राफ्ट सुविधा काय आहे? यामुळे काय फायदा होतो?

Home Loan ओव्हरड्राफ्ट सुविधा काय आहे? यामुळे काय फायदा होतो?

Home Loan ओव्हरड्राफ्ट सुविधा काय आहे? यामुळे काय फायदा होतो?

होम लोन ओव्हरड्राफ्ट हा एक प्रकारचा लोन आहे जे कर्जदार घेतात. आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला तात्काळ पैशांची गरज भासल्यास तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 मार्च : आपल्या स्वप्नातलं घर (Dream Home) असावं असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी बहुतेक लोक गृहकर्ज (Home Loan) घेणे हा एक चांगला पर्याय मानतात. परंतु गृहकर्जाचा कालावधी खूप मोठा (20 ते 30) वर्षे असू शकतो. आता अशा परिस्थितीत त्या व्यक्तीने लवकर पैसे भरले तरी ईएमआयचा बोजा वाढू शकतो. हे समजून घेऊन बहुतांश बँका ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा आणतात, त्यापैकी एक म्हणजे ओव्हरड्राफ्ट सुविधा (Overdraft Service). होम लोन ओव्हरड्राफ्ट सुविधा काय आहे (HOME LOAN OVERDRAFT FACILITY) होम लोन ओव्हरड्राफ्ट हा एक प्रकारचा लोन आहे जे कर्जदार घेतात. आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला तात्काळ पैशांची गरज भासल्यास तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. पण ते तुम्हाला महागात पडू शकते, त्यामुळे असे करण्यापूर्वी गृहकर्जाच्या ओव्हरड्राफ्टशी संबंधित सर्व आवश्यक माहिती घ्यावी. Aadhar Card मध्ये वारंवार बदल करता येत नाही, वाचा कोणते बदल किती वेळा करता येतील? री-पेमेंट लवचिकता (Re-Payment Flaxibility) ही सुविधा अशा लोकांसाठी आहे ज्यांना त्यांचे उत्पन्न वाढते म्हणून EMI वाढवणे योग्य वाटते. यामुळे खात्यातील अतिरिक्त रक्कम एकूण थकबाकी मुद्दल आणि व्याज कमी करते. त्यामुळे गृहकर्जाच्या परतफेडीला गती मिळते. हे तुमचे दीर्घकालीन कर्ज जलद समाप्त करू शकते. होम लोनवर ओव्हरड्राफ्ट वापरून तुम्ही प्रीपेमेंट दंड टाळू शकता. Investment Tips: मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणुकीदरम्यान ‘या’ चुका टाळा, नुकसान होणार नाही ही सुविधा मिळवा गृहकर्जातील ओव्हरड्राफ्ट सुविधा मंजूर कर्जाप्रमाणे काम करते. यातून तुम्ही तुमच्या गरजेनुसार पैसे काढू शकता. यामध्ये तुम्ही वापरत असलेल्या रकमेवरच तुम्हाला व्याज द्यावे लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात