जाहिरात
मराठी बातम्या / मनी / आता कार्ड नसलं तरी ATM मशीनमधून काढता येणार पैसे! काय आहे Process पाहा

आता कार्ड नसलं तरी ATM मशीनमधून काढता येणार पैसे! काय आहे Process पाहा

आता कार्ड नसलं तरी ATM मशीनमधून काढता येणार पैसे! काय आहे Process पाहा

आता ATM मशीनमध्येही काळानुरूप बदल होत असल्याचं दिसत आहे. कार्डलेस पैसे काढणारं (Cardless Cash Withdrawal) एटीएम मशीन तयार झालं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 1 एप्रिल: तंत्रज्ञानामुळे सध्याच्या युगात मोठे बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. तंत्राज्ञानामुळे बँकिंग क्षेत्रातही मोठे बदल झाले आहेत. एटीएम मशीन (ATM) म्हणजेच ऑटोमॅटेड टेलर मशिन (Automated Teller Machine) यातही काळानुरूप बदल होत असल्याचं दिसत आहे. एनसीआर कॉर्पोरेशननं (NCR Corporation) पहिल्यांदाच युपीआय आधारीत (Unified Payment Interface) कार्डलेस पैसे काढणारं (Cardless Cash Withdrawal) एटीएम मशिन तयार केले आहे. एनसीआर कॉर्पोरेशननं यासाठी सिटी युनियन बँकेसोबत करार केला आहे. बँकेनं 1500 एटीएम मशिन QRकोड आधारीत मशिन अपडेट करण्यास सांगितले आहे. लवकरच इतर सरकारी आणि खासगी बँकांशी याबाबत चर्चा करून ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ‘मोबाईलमधील UPI App एटीएम कार्डसारखं वापरता येणार आहे. त्यावरील QR कोड स्कॅन करुन पैसे काढता येणार आहे. यासाठी फक्त सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात येणार आहे. कोणतंही हार्डवेअर अपडेट करण्याची गरज नाही,’ असं एनसीआरचे मॅनेजिंग डायरेक्टर नवरोझ दस्तूर यांनी सांगितले आहे. ‘नविन तंत्रज्ञानाचा विचार करता आम्ही एनसीआरसोबत करार केला आहे. या तंत्रज्ञानामुळे खातेदारांना फायदा होणार आहे. बिना एटीएम कार्ड बँकेतून पैसे काढणं शक्य होणार आहे. यासाठी UPI QR कोड एटीएमवर स्कॅन करावा लागेल आणि पैसे काढता येणार आहेत’ असं सिटी यूनियन बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर एन कमाकोडी यांनी सांगितलं.

ठेवीदारांना मोठा दिलासा, PPF सह व्याजदरांमध्ये कपातीचा निर्णय सरकारनं घेतला मागे

एटीएममधून पैसे कसे काढणार? तुमच्या मोबाईलमध्ये BHIM, Paytm, GPay सारखे यूपीआय असणारे अॅप हवेत. या यूपीआयमधील QR कोड एटीएम मशिनवर स्कॅन करून आपल्या मोबाईलद्वारे पैसे काढता येणार आहेत. ही सुविधा सुरक्षित असून QR कोडने पैसे काढल्यानंतर काही सेकंदात तो बदलणार आहे. सध्या या सुविधेच्या माध्यमातून 5 हजारापर्यंत रक्कम काढता येणार आहे. QR कोडद्वारे पैसे काढणं सुरक्षित आहे? एटीएम कार्डच्या तुलने यूपीआय क्यूआर कोडने पैसे काढणं सर्वात सुरक्षित आहे. कारण कार्ड स्किम होऊ शकतं. मात्र QR कोडने पैसे काढताना दरवेळी कोड बदलतो. त्यामुळे फसवणूक होणं शक्य नाही, असं एनसीआरचे मॅनेजिंग डायरेक्टर नवरोझ दस्तूर यांनी सांगितले आहे. या बँकांच्या खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! आजपासून चेकबुक, पासबुक ठरणार अवैध एटीएम मशिन 2 सप्टेंबर 1969 साली अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात लावण्यात आलं होतं. हे एटीएम मशिन अमेरिकेच्या केमिकल बँकेने लावलं होतं. बार्कलेज बँकेने 27 जून 1967 लंडनमध्ये एटीएम लावलं होतं. तर जपानमध्ये 1966 साली पहिल्यांदा एटीएमचा वापर करण्यात आला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ATM , money , upi
  • First Published :
जाहिरात
जाहिरात