मराठी बातम्या /बातम्या /मनी /या बँकांच्या खातेधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! आजपासून cheque book, passbook ठरणार invalid

या बँकांच्या खातेधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! आजपासून cheque book, passbook ठरणार invalid

उल्लेख केलेल्या बँकांच्या खातेधारकांनी आता या गोष्टीची नोंद घ्यायला हवी, की या बँकांची चेकबुक (Chequebooks) आणि पासबुक (Passbook) आजपासून (एक एप्रिल 2021) अवैध होणार आहेत.

उल्लेख केलेल्या बँकांच्या खातेधारकांनी आता या गोष्टीची नोंद घ्यायला हवी, की या बँकांची चेकबुक (Chequebooks) आणि पासबुक (Passbook) आजपासून (एक एप्रिल 2021) अवैध होणार आहेत.

उल्लेख केलेल्या बँकांच्या खातेधारकांनी आता या गोष्टीची नोंद घ्यायला हवी, की या बँकांची चेकबुक (Chequebooks) आणि पासबुक (Passbook) आजपासून (एक एप्रिल 2021) अवैध होणार आहेत.

नवी दिल्ली : देना बँक (Dena Bank), विजया बँक, कॉर्पोरेशन बँक (Corporation Bank), आंध्र बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक आणि अलाहाबाद बँक या बँकांचं विलीनीकरण एक एप्रिल 2019 आणि एक एप्रिल 2020 रोजी कार्यान्वित झालं. वर उल्लेख केलेल्या बँकांच्या खातेधारकांनी आता या गोष्टीची नोंद घ्यायला हवी, की या बँकांची चेकबुक आणि पासबुक आजपासून (एक एप्रिल 2021) अवैध (Passbook Invalid) होणार आहेत.

देना बँक (Dena Bank) आणि विजया बँक (Vijaya Bank) यांचं बँक ऑफ बडोदामध्ये एक एप्रिल 2019 रोजी विलीनीकरण झालं. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBI) या बँका पंजाब नॅशनल बँकेत (PNB) विलीन झाल्या. त्यानंतर सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत (Canara Bank), तर आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक (Corporation Bank) युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाली. अलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन झाली. विलीनीकरणाची ही प्रक्रिया (Bank Merger) टप्प्याटप्प्याने पूर्ण झाल्यानंतर आता एक एप्रिल 2021पासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात आणखी काही बदल होणार आहेत.

पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांनी आधीच आपल्या ग्राहकांना कल्पना दिली आहे, की ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक ऑफ इंडिया, विजया बँक आणि देना बँक यांची सध्या अस्तित्वात असलेली चेकबुक्स (Cheque books) एक एप्रिल 2021पासून वापरता येणार नाहीत.

या बँकांच्या खातेदारांनी हेही लक्षात घ्यावं, की त्यांचा खाते क्रमांक, IFSC, MICR कोड, बँक शाखेचा पत्ता, चेकबुक, पासबुक (Passbook) या गोष्टींमध्ये बदल होणार आहेत. दरम्यान, सिंडिकेट बँक आणि कॅनरा बँकेचं सध्याचं चेकबुक आणि पासबुक मात्र 30 जून 2021पर्यंत चालणार आहे, असंही कळवण्यात आलं आहे.

या संदर्भातली सगळी ताजी माहिती ई-मेल किंवा एसएमएसद्वारे मिळवण्यासाठी या सगळ्या बँकांच्या ग्राहकांनी त्यांचा मोबाइल क्रमांक, पत्ता, ई-मेल अॅड्रेस, नॉमिनी आदी माहिती बँक खात्यात अपडेट ठेवावी.

नवं चेकबुक आणि पासबुक मिळण्यासाठी ग्राहकांनी आपली आधीची बँक कोणत्या अँकर बँकेत विलीन झाली आहे, हे पाहून त्या बँकेकडे संपर्क साधावा. नवं चेकबुक आणि पासबुक मिळाल्यानंतर खातेधारकांनी जिथे जिथे आपला जुना बँक खाते क्रमांक दिला आहे, तिथे तिथे नवा बँक खाते क्रमांक अपडेट करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून गैरसोय टळू शकेल. म्युच्युअल फंड्स, ट्रेडिंग अकाउंट्स, जीवन विमा पॉलिसी, इन्कम टॅक्स अकाउंट, एफडी अकाउंट, आरडी अकाउंट, पीएफ अकाउंट यांसह अन्य अनेक ठिकाणी दिलेला बँक खाते क्रमांक अपडेट करणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Bank, Bank services, Money, Pnb bank