Home /News /money /

ठेवीदारांना मोठा दिलासा, PPF सह व्याजदरांमध्ये कपातीचा निर्णय सरकारनं घेतला मागे

ठेवीदारांना मोठा दिलासा, PPF सह व्याजदरांमध्ये कपातीचा निर्णय सरकारनं घेतला मागे

केंद्र आणि राज्यातील टॅक्स अधिकाऱ्यांनी, बनावट कंपन्यांद्वारा टॅक्समध्ये होणारी अथवा केली जाणारी फसवणूक टाळण्यासाठी बायोमेट्रिक्सद्वारे ऑनलाईन नोंदणीचा विचार केला जात आहे. जीएसटी परिषदेने दोन दिवसांच्या बैठकीनंतर काही कडक नियम सुचवले आहेत.

केंद्र आणि राज्यातील टॅक्स अधिकाऱ्यांनी, बनावट कंपन्यांद्वारा टॅक्समध्ये होणारी अथवा केली जाणारी फसवणूक टाळण्यासाठी बायोमेट्रिक्सद्वारे ऑनलाईन नोंदणीचा विचार केला जात आहे. जीएसटी परिषदेने दोन दिवसांच्या बैठकीनंतर काही कडक नियम सुचवले आहेत.

. 1 एप्रिलपासून पीपीएफसह (PPF) सगळ्या ठेवींवरील व्याजदरांमध्ये (Interest rates on Investment) मोठी कपात करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, आता ठेवीदारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.

    नवी दिल्ली 01 एप्रिल : केंद्र सरकारने सर्वसामान्य गुंतवणुकदारांना मोठा धक्का दिला होता. 1 एप्रिलपासून पीपीएफसह (PPF) सगळ्या ठेवींवरील व्याजदरांमध्ये (Interest rates on Investment) मोठी कपात करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, आता ठेवीदारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. व्याजदरांमध्ये कपातीचा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे. पीपीएफसह (PPF) सगळ्या ठेवींवरील व्याजदर आधीप्रमाणेच राहाणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. याआधी जारी करण्यात आलेले आदेश मागे घेण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी आपल्या ट्वीटद्वारे दिली आहे. व्याजदर कमी करण्याचा घेतला होता निर्णय - 1 एप्रिलपासून सेव्हिंग डिपॉझिटवर 3.5 टक्के, एका वर्षाच्या डिपॉझिटवर 4.4 टक्के, 2 वर्षांच्या डिपॉझिटवर 5 टक्के आणि 5 वर्षांच्या डिपॉझिटवर 5.8 टक्के व्याज देण्यात येईल, तसंच पीपीएफवर 6.4 टक्के व्याज मिळेल, असं जाहीर करण्यात आलं होतं. सगळ्या ठेवींवरील व्याजदरात सरासरी एक टक्का घट करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. हे दर  1 एप्रिल 2021 ते 30 जून 2021 या तिमाहीसाठी लागू होणार होते. कोरोनाच्या संकटामुळे देशातली अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे, त्यामुळे सरकारच्या उत्पन्नाचा स्त्रोतही आटला आहे, त्यामुळे व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता हा निर्णय मागे घेण्यात आल्यानं ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Nirmala Sitharaman, PPF, Rate of interest

    पुढील बातम्या