मराठी बातम्या /बातम्या /मनी /

SBI च्या एटीएममधून का येत नाही 2 हजारची नोट? वाचा काय आहे अर्थमंत्रालयाचं स्पष्टीकरण

SBI च्या एटीएममधून का येत नाही 2 हजारची नोट? वाचा काय आहे अर्थमंत्रालयाचं स्पष्टीकरण

गेल्या काही दिवसांपासून एसबीआयच्या (SBI) आणि इंडियन बँकेच्या अनेक एटीएममधून 2000 च्या नोटा येत नाही आहेत. याचं कारण अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज संसदेत स्पष्ट केलं आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 17 मार्च: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय (SBI-State Bank of India) आणि इंडियन बँक यांच्या एटीएममधून 2000 रुपयांची नोट का येत नाही? या प्रश्नाचं उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेत काही मुद्दे मांडले आहेत. त्यांनी सांगितले की,  या दोन्ही सरकारी बँकांच्या एटीएममध्ये 200 आणि 500 रुपये ठेवण्याच्या दृष्टीने बदल करण्यास सुरवात केली आहे. ते म्हणाले, दोन हजार रुपयांच्या नोटेचे सुट्टे करून घेताना ग्राहकांना त्रास होत होता. म्हणूनच एसबीआय आणि इंडियन बँकेने एटीएममध्ये 500 आणि 200 रुपयांच्या नोटा ठेवण्याबाबत बदल करण्यास सुरवात केली आहे.

(हे वाचा-6 दिवसात 5000 रुपयांच्या घसरणीमुळे 40 हजारांपेक्षा खाली उतरलं सोनं, पाहा आजचे दर)

सध्या देशात 7.40 लाख कोटी रुपयांच्या 2000 च्या नोटा चलनात आहेत. अनुराग ठाकूर म्हणाले की, सध्या देशात 19,624 दशलक्ष 100 रुपयाच्या नोटा चलनात आहेत. याशिवाय 42,784 कोटी रुपयांच्या 50 रुपयांच्या नोटा चलनात आहेत.

(हे वाचा-कोरोनाचा परिणाम प्लॅटफॉर्म तिकीटांवर, गर्दी टाळण्यासाठी दर 10 वरून थेट 50 रुपये)

अलीकडे एक बातमी पसरली होती की, सरकारने 2 हजार रुपयांच्या नोटांचे मुद्रण थांबवण्याचे आदेश दिले आहेत. इतकेच नव्हे तर एका अहवालात सांगण्यात आलं होती की, एका सरकारी बँकेने सर्व शाखांकडून 2 हजार रुपयांच्या नोटा परक मागवण्यात आल्या आहेत आणि अधिकाऱ्यांना देखील आदेश देण्यात आले आहेत की ग्राहकांनी पैसे काढल्यांनतर त्यांना 2000च्या नोटा देऊ नये. मात्र या अफवांबाबत केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे. सरकारने खरंच 2 हजारांच्या नोटांची छपाई थांबवण्याचे आदेश दिले आहेत का, या प्रश्नाचं उत्तर देताना  अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत सांगितले की दोन हजार रुपयांच्या नोटांचे मुद्रण थांबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही.

ते म्हणाले की, नोटांच्या छपाईचा निर्णय सरकार आरबीआयच्या सल्ल्यानुसार घेते, जेणेकरून देशात वेगवेगळ्या चलनी नोटांचे संतुलन अबाधित राहील.

First published:

Tags: Sbi ATM