6 दिवसात 5000 रुपयांच्या घसरणीमुळे 40 हजारांपेक्षा खाली उतरलं सोनं, इथे पाहा मंगळवारचे दर

डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मुल्य वधारलं आहे आणि त्याचप्रमाणे सोन्याच्या दरात आंतराष्ट्रीय बाजारात घसरण झाली आहे. परिणामी सोन्याचांदीच्या किंमती उतरल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 मार्च : डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मुल्य वधारलं आहे आणि त्याचप्रमाणे सोन्याच्या दरात आंतराष्ट्रीय बाजारात घसरण झाली आहे. याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. या दोन्ही बाबींमुळे सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याची किंमत प्रति तोळा 80 रुपयांनी कमी झाली आहे.

(हे वाचा- कोरोनाचा परिणाम प्लॅटफॉर्म तिकीटांवर, गर्दी टाळण्यासाठी दर 10 वरून थेट 50 रुपये)

त्याचप्रमाणे औद्योगिक मागणी कमी झाल्यामुळे चांदीच्या किंमती उतरल्या आहेत. प्रति किलो चांदीची किंमत 734  रुपयांनी कमी झाली आहे.

सोन्याचे नवे दर (Gold Price 17th March 2020)

मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव 80 रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे प्रति तोळा सोन्याची किंमत 39,759 रुपयांनी कमी होत 39,719  रुपयांवर पोहोचली आहे.

चांदीचे नवे दर (Silver Rate 17th March 2020)

मंगळवारी चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. चांदीचे दर प्रति किलो 734 रुपयांनी कमी झाले आहेत. परिणामी चांदीचे दर प्रति किलो 36,682 रुपयांवरून 35,948  रुपयांवर पोहोचले आहेत. कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. परिणामी या क्षेत्रातील चांदीची मागणी देखील कमी झाली आहे.

सोन्या-चांदीच्या दर उतरण्याचे कारण

HDFC सिक्योरिटीजचे सीनियर अॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंतवणूकदार आता सोन्या-चांदीच्या माध्यमातून नफा वसूल करून कोसळलेल्या शेअर बाजाराला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.

सहा दिवसात 5000 हजार रुपयांनी उतरलं सोनं

देशांतर्गत फ्यूचर मार्केटमध्ये सोन्याच्या किंमती उतरत आहेत. मागील पाच व्यापार सत्रांमध्ये सोन्याच्या किंमती प्रति तोळा 5000 रुपयांनी घसरल्या आहेत. तर एमसीएक्स (MCX) वर चांदी दहा टक्क्यांनी घसरली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीमुळे त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 17, 2020 06:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading