मराठी बातम्या /बातम्या /मनी /

कोरोनाचा परिणाम प्लॅटफॉर्म तिकीटांवर, गर्दी टाळण्यासाठी दर 10 वरून थेट 50 रुपये

कोरोनाचा परिणाम प्लॅटफॉर्म तिकीटांवर, गर्दी टाळण्यासाठी दर 10 वरून थेट 50 रुपये

रेल्वेमध्ये आणि फलाटांवर होणारी गर्दी लक्षात घेता, भारतील रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटांचे दर वाढवण्यात आले आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar
मुंबई, 17 मार्च: कोरोनाचा (Coronavirus) चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दरम्यान रेल्वेमध्ये आणि फलाटांवर होणारी गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अद्याप वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद करायची की नाही याबाबत निर्णय झाला नसला तरी रेल्वेकडून तिकिटदरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून ही शक्कल लढवण्यात आली आहे. हे नवे दर आजपासूनच लागू होणार आहेत. (हे वाचा-BREAKING : महाराष्ट्र लॉकडाउनच्या दिशेने; लोकल, बस बंद नाही पण...) मध्य रेल्वेच्या निर्णयानुसार मुंबई, पुणे भुसावळ, नागपूर आणि सोलापूर या ठिकाणी प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयांवरून वाढवून 50 रुपये करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे पश्चिम रेल्वेच्या विविध ठिकाणांवर विविध प्लॅटफॉर्म तिकीटदर आहे. ते तिकीटदर खालील प्रमाणे आहेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी अशी माहिती दिली की,  ‘आपण सध्या कोरोना व्हायरसच्या फेज 2 मध्ये असून फेज 3 मध्ये जाऊ नये, यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे. खासगी क्षेत्रात शटडाऊन गरजेचं आहे. अत्याआवश्यक सेवा वगळून Work Form Home वर जवळपास सर्व कंपन्यानी सहमती दर्शवली आहे. तसेच राज्यातील सार्वजनिक वाहतूक आणि मुंबईत लोकल, मेट्रो ट्रेन बंद करायच्या की नाही, याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील.’ राजेश टोपे पुढे म्हणाले की, ‘मुंबईत लोकलच्या डब्यात जास्तीतजास्त किती माणसं असावेत, याबाबत काही मार्गदर्शक सूचना देण्याबाबत विचार सुरु आहे. कोरोनावर नियंत्रणासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत.’ मुंबईत लोकल ट्रेन, मेट्रो, बस सारखी सार्वजनिक वाहतूक काही दिवस बंद करण्याबाबत आज कॅबिनेट यात चर्चा होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात एक आठवड्यासाठी किंवा काही दिवस बंद करता येईल का, यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.  याबाबत मंत्रिमंडळाची तातडीची बैठक सुरू आहे.
कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी भारताकडे सध्या 30 दिवसांचा कालावधी आहे. भारतात सध्या कोरोना दुसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे महत्त्वाचे आहे.
First published:

पुढील बातम्या