आरोग्यसेवेत 'हे' राज्य नंबर 1, महाराष्ट्राचं स्थान कितवं?

Niti Ayog, Health Index - या इंडेक्समध्ये आरोग्यसेवा कुठे महाग आहे, हेही दर्शवलंय. कुठल्या राज्यांमध्ये रुग्णाच्या खिशातून जास्त पैसे जातात, ते दाखवलंय.

News18 Lokmat | Updated On: Jun 25, 2019 06:40 PM IST

आरोग्यसेवेत 'हे' राज्य नंबर 1, महाराष्ट्राचं स्थान कितवं?

मुंबई, 25 जून : नीती आयोगानं हेल्थ इंडेक्स रँकिंग घोषित केलंय. आरोग्य निर्देशांकात केरळ नंबर वन ठरलंय. या रँकिंगमध्ये केरळनंतर महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशाला जागा मिळालीय. गेल्या वेळीही केरळ सर्वोत्तम होतं. आंध्र प्रदेश या वेळी 6व्या नंबरवर आणि महाराष्ट्र 4थ्या नंबरवर आहे. 2015-16 आणि 2017-18 च्या मध्ये 23 आरोग्य निर्देशांकांच्या आधारे आणि राज्यांची आरोग्य सेवा तपासून हे नंबर्स दिलेत.

दिल्लीत जास्त खर्च - या इंडेक्समध्ये आरोग्यसेवा कुठे महाग आहे, हेही दर्शवलंय. कुठल्या राज्यांमध्ये रुग्णाच्या खिशातून जास्त पैसे जातात, ते दाखवलंय.

TRAI बदलणार अनेक नियम, आता टीव्ही पाहणं होईल स्वस्त

सर्वात जास्त खर्च मणिपूरमध्ये येतो. तो जवळजवळ 10 हजारापेक्षा जास्त येतो. सर्वात कमी खर्च दादरा, नगर हवेली इथे येतो. तो 471 रुपये आहे. दिल्लीत हा खर्च जास्त आहे. तो एका व्यक्तीला 8 हजारापेक्षा जास्त आहे.

आरोग्य सेवेत टाॅप 3

Loading...

1. केरळ

2. आंध्र प्रदेश

3. महाराष्ट्र

खुशखबर! पुढच्या महिन्यात स्वस्त होऊ शकतं स्वयंपाक करणं आणि कार चालवणं

सुधारणा करणारे टाॅप 3

1. हरियाणा

2. राजस्थान

3. झारखंड

आरोग्यसेवेत कमकुवत

1. ओडिशा

2. बिहार

3. उत्तर प्रदेश

मोदी सरकारचा निर्णय, वाहतूक नियम मोडले तर पडेल मोठा दंड

काय आहे अहवाल?

नीती आयोगानं आरोग्य मंत्रालयासोबत 23 वेगवेगळ्या परिमाणांवर राज्यांना तपासलं. त्या आधारे हा राज्याचं हेल्थ रँकिंग घोषित केलं गेलं. नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी हेल्थ रँकिंग प्रसिद्ध करताना सांगितलं की छोट्या राज्यांमध्ये सुधारणा आहे.

मोठ्या राज्यांमध्ये हरियाणा, राजस्थान आणि झारखंडनं गेल्या वेळेपेक्षा आताच्या रँकिंगमध्ये सुधारणा केलीय. छोट्या राज्यांमध्ये मिझोराम पुढे आहे. त्रिपुरा आणि मणिपूर यांनीही रँकिंग सुधारलंय.

VIDEO : तुम्ही खूप उंचावर गेलात, मोदींचा काँग्रेसला टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: niti ayog
First Published: Jun 25, 2019 06:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...