मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अदानी समूहाशी संबंधित प्रकरणात आज आपले पहिले वक्तव्य केले आहे. अर्थसंकल्पानंतर अर्थमंत्र्यांनी आज नेटवर्क 18 चे एमडी आणि ग्रुप एडिटर-इन-चीफ राहुल जोशी यांच्याशी खास संवाद साधला, ज्यात त्यांनी अर्थसंकल्पीय प्रस्तावांपासून अदानी समूहाशी संबंधित बाबींपर्यंतच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
चर्चेदरम्यान त्या अदानी समूहाच्या बाबतीत म्हणाल्या की, एसबीआय आणि एलआयसी समूहातील गुंतवणूक मर्यादित आहे. त्याचबरोबर बाजाराचे नियामक आणि बँकिंग व्यवस्थेवरही त्यांनी पूर्ण विश्वास दाखवला आहे.
45 लाख कोटींचा अर्थसंकल्प मांडला, पण अर्थमंत्री सीतारामन यांची बकेट लिस्ट आहे साधी, शांत झोप आणि....
अदानी समूहाबाबत अर्थमंत्री म्हणाल्या की, एसबीआय आणि एलआयसी या दोघांनीही या प्रकरणी संपूर्ण माहितीसह आपली भूमिका मांडली आहे. दोघांनीही सांगितले आहे की, ग्रुपमध्ये त्यांचा एक्सपोजर विहित मर्यादेच्या आत आहे.
अर्थमंत्र्यांनी बाजार नियंत्रकांवर विश्वास व्यक्त केला आणि सांगितले की त्यांनी बाजाराला चांगल्या स्थितीत ठेवले आहे. त्या म्हणाल्या की, आज भारतीय बँकिंग व्यवस्था भक्कम स्थितीत असून बँका बाजारातून पैसा उभा करण्यास पूर्णपणे सक्षम आहेत. बँकांमध्ये जोखीम असती तर ते बाजारातून पैसे उभे करण्याच्या स्थितीत नसते, असेही त्या म्हणाल्या.
हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. ग्रूप कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत. समूहातील कंपन्यांमध्ये एलआयसीचे शेअर्स आहेत, तर बँकांनीही या कंपन्यांना कर्ज दिली आहेत. तेव्हापासून एलआयसी आणि बँकांच्या गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. यावर अर्थमंत्र्यांनी उत्तर दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Budget 2023, Nirmala Sitharaman