• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • IRCTC च्या शेअरमध्ये गुंतवणूक ठरेल फायदेशीर, पाहा काय आहे जाणकारांचं म्हणणं

IRCTC च्या शेअरमध्ये गुंतवणूक ठरेल फायदेशीर, पाहा काय आहे जाणकारांचं म्हणणं

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसीच्या (IRCTC) शेअरची किंमत आज 2,248 रुपयांवर पोहोचली आहे. हा आयआरसीटीसीच्या शेअरचा आतापर्यंतचा उच्चांक आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 8 जुलै: जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये (Investment in Share Market) गुंतवणूक करण्याची संधी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही एक खूप महत्वाची बातमी आहे. जिथे गुंतवणूक करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसीच्या (IRCTC) शेअरची किंमत आज 2,248 रुपयांवर पोहोचली आहे. हा आयआरसीटीसीच्या शेअरचा आतापर्यंतचा उच्चांक आहे. या पूर्वी या शेअरची सर्वाधिक वाढ ही 2,222 रुपयांवर पोहोचली होती. आजच्या या उच्चांकाने जुन्या किमतीचा उच्चांक मोडला आहे. रेल्वेचे शेअर बुधवारी 2,188 रुपयांच्या क्लोजिंग प्राईजपेक्षा (closing price) 9 रुपयांनी वर उघडले. मागील महिन्याच्या तुलनेत आयआरसीटीसीचा वाटा जवळपास 2 टक्क्यांनी वाढला आणि मागील महिन्यातील उच्चांकाला मागे सोडून शेअरने आज आतापर्यंतचा उच्चांक गाठला. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काउंटरचे फंडामेंटल (Fundamental) आणि टेक्निकल (Technical) दोन्ही सकारात्मक ट्रेंड (positive trends) दर्शवत असल्याने आयआरसीटीसी शेअरची किंमत (IRCTC Share Price) वाढली आहे. शेअर प्राइज 2,500 रुपयांपर्यंत जाऊ शकते - मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, टेक्निकल अ‍ॅनालिस्ट म्हणाले की, कंपनीच्या शेअर्सची किंमत टेक्निकल चार्टवर (technical chart) सकारात्मक दिसत आहे आणि 2100 रुपयांवर ब्रेक आउटनंतर (break out) या शेअरने वरील पातळी कायम राखली आहे. यामुळे यात आणखी तेजी येण्याची शक्यता आहे. शॉर्ट टर्ममध्ये शेअरची किंमत 2,500 रुपयांपर्यंत जाऊ शकते. यामुळे, ज्या गुंतवणूकदारांकडे हे शेअर आहेत, त्यांनी सध्याच्या काळात तरी हे शेअर विकू नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. यादिवशी येणाऱ्या IPOमध्ये पैसे गुंतवून व्हा मालामाल! 72-76 रुपयात खरेदी करा शेअर दीर्घकाळासाठी ठरू शकतं फायदेशीर - लॉकडाउन उघडल्यामुळे कंपनीचा व्यवसाय वाढला आहे आणि त्याचा परिणाम त्याच्या शेअरवर दिसून येत आहे. भारतीय रेल्वे देखील नवीन गाड्या सुरू करत आहे. कंपनी लवकरच आपल्या पूर्ण क्षमतेने काम करण्यास सुरू करेल. आयआरसीटीसीचे बिझनेस मॉडेल भारतीय रेल्वेशी जोडलेले असून रेल्वेच्या कामकाजाच्या वाढीमुळे कंपनीला याचा मोठा फायदा होणार आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, आयआरसीटीसी हा असा शेअर आहे जो पोर्टफोलिओमध्ये दीर्घ काळासाठी ठेवायला पाहिजे. पुढील 12-18 महिन्यांत या शेअरची किंमत 3,200 रुपयांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे आयआरसीटीसीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करायची चांगली संधी आहे. तसंच ज्यांच्याकडे शेअर आहेत त्यांना येत्या काळात चांगले रिटर्न मिळतील.
First published: