मुंबई, 26 जून : मुंबई विद्यापीठात नोकरी करायचीय? मग त्यासाठी एक चांगली संधी आहे. मुंबई विद्यापीठानं भरती जाहीर केलीय. संशोधन सहाय्यक, ग्रामसाथी, क्षेत्र समन्वयक अशा पदांसाठी भरती सुरू आहे. एकूण 67 जागा आहेत.
पद आणि संख्या
संशोधन सहाय्यक - 3
ग्रामसाथी - 60
क्षेत्र समन्वयक - 4
सावधान ! SWIGGY, ZOMATOवरील ऑर्डरमुळे तुमचा खिसा कापला जातोय
शैक्षणिक पात्रता
संशोधन सहाय्यक पदासाठी मान्यताप्राप्त संस्थेकडून समाजशास्त्राची पदवी हवी. या पदासाठी कमीत कमी 50 टक्के गुण आवश्यक आहेत. ग्रामसाथी पदासाठी उमेदवार 12वी उत्तीर्ण हवा. तर क्षेत्र समन्वयक पदासाठी उमेदवार पदवीधर हवा.
1 जुलैपासून रोजच्या आयुष्यातल्या 'या' गोष्टी बदलणार, खिशावर होणार परिणाम
वयाची मर्यादा
संशोधन सहाय्यक पदासाठी उमेदवाराचं वय 30 वर्षापर्यंत हवं. ग्रामसाथी पदासाठी उमेदवाराचं वय 35 वर्षापर्यंत हवं तर क्षेत्र समन्वयक पदासाठी ते 45 वर्षापर्यंत हवं. 25 जून 2019 पर्यंत इतकं वय पूर्ण हवं.
दर महिन्याला कमवा 70 हजार रुपये, 'असा' सुरू करा व्यवसाय
नोकरीचं ठिकाण मुंबई आहे. अर्जाची फी 200 रुपये आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता - प्रमुख, मुंबई स्कुल आॅफ इकाॅनाॅमिक्स अॅण्ड पब्लिक पाॅलिसी, युनिव्हर्सिटी आॅफ मुंबई, रानडे भवन, 3रा मजला, विद्यानगरी कॅम्पस, कलिना, मुंबई - 400098
अधिक माहितीसाठी http://mar.mu.ac.in/portal/ यावर क्लिक करा.
दरम्यान, मोदी सरकारच्या 100 दिवसांच्या अजेंड्यांमध्ये नोकऱ्या आणि रोजगार वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. नीती आयोग आता नव्या सरकारसाठी आर्थिक अजेंडा बनवणार आहे. यामध्ये देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी काही महत्त्वाच्या सुधारणा करण्यात येणार आहेत.
कौशल्य विकासाला प्राधान्य देण्यासाठी सरकार खाजगी शिक्षण संस्थांना कर्ज देणार आहे. त्याशिवाय खाजगी कंपन्यांना सवलती देण्याचाही सरकार विचार करत आहे. स्किल इंडियासाठी सरकारने 3400 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. आता हा निधी आणखी वाढवण्यात येईल.
VIDEO: मॉब लिंचिंगवर पहिल्यांदाच बोलले PM मोदी, संसदेत म्हणाले...