सावधान ! SWIGGY, ZOMATOवरील ऑर्डरमुळे तुमचा खिसा कापला जातोय

swiggy, zomato, online food - स्विगी आणि झोमॅटोसारख्या ऑनलाइन कंपन्या ग्राहकांना जेवण, खाद्यपदार्थ पुरवतात. पण ग्राहकांना आता ऑनलाइन जेवण मागवणं महाग पडू शकतं.

News18 Lokmat | Updated On: Jun 26, 2019 04:05 PM IST

सावधान ! SWIGGY, ZOMATOवरील ऑर्डरमुळे तुमचा खिसा कापला जातोय

मुंबई, 26 जून : स्विगी आणि झोमॅटोसारख्या ऑनलाइन  कंपन्या ग्राहकांना जेवण, खाद्यपदार्थ पुरवतात. पण ग्राहकांना आता ऑनलाइन जेवण मागवणं महाग पडू शकतं. कंपनीनं आपल्या अनेक पदार्थांचे दर 5 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत वाढवलेत.

ऑनलाइन फूड मालक आपल्या कोषाची भरपाई करण्यासाठी देशभरातल्या हाॅटेल्समधून खाद्य पदार्थांची मूळ किंमत वाढवतायत.

1 जुलैपासून रोजच्या आयुष्यातल्या 'या' गोष्टी बदलणार, खिशावर होणार परिणाम

आउटलेटच्या आधारे 5 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत किंवा त्यातून जास्त महाग असू शकतं. अनेकदा ग्राहकांना हे माहीतही नसतं की ते केलेल्या ऑर्डरवर जास्त पैसे देतायत.

तुम्ही गुगलवर तपासून पाहिलंत तर ZOMATO वर दिलेली किंमत आणि त्या हाॅटेलच्या मेन्यूमधली किंमत यात अंतर आहे. पण जेव्हा ग्राहक वेबसाइटच्या ऑर्डर ऑनलाइन टॅगवर क्लिक करतो, तेव्हा किमती आपोआप वाढतात.

Loading...

'या' कामासाठी पुरुषांपेक्षा जास्त कर्ज घेतात महिला

हाॅटेल, रेस्टाॅरंटचे मालक डिलिवरी कंपनींना काही कमिशन देतात. त्यामुळे किंमतीत 15 ते 35 टक्के फरक पडतो.

मोठ्या ब्रँडच्या हाॅटेल्सनी ऑनलाइन ग्राहकांसाठी आपल्या मेन्यूच्या किमती वाढवण्याचा अधिकार दिलाय. एकदा का हाॅटेल मालकांनी किमती वाढवण्याची परवानगी दिली तर SWIGGY आणि ZOMATO सारख्या कंपन्यांना दर वाढवणं सोपं होतं.

झोमॅटोचं मुख्य ऑफिस आहे गुरगावला. 200 शहरांमध्ये झोमॅटोची सेवा आहे. एक लाखापेक्षा जास्त रेस्टाॅरंट्स झोमॅटोवर लिस्टेड आहेत. मार्च 2019मध्ये 30 मिलियन डिलिव्हरीज झाल्यात.

1 जुलैपासून रोजच्या आयुष्यातल्या 'या' गोष्टी बदलणार, खिशावर होणार परिणाम

झोमॅटोचे मुख्य अधिकारी दीपिंदर गोयल म्हणाले, झोमॅटोची टेबल रिझर्वेशनचीही सुविधा आहे. ही सेवा भारतासह 8 देशांत आहे. 16000 रेस्टाॅरंटपैकी तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या रेस्टाॅरंटमध्ये झोमॅटोवरून टेबल बुक करू शकता.

असं म्हणतात मुंबई कधी झोपत नाही. पण झोमॅटोसाठी मध्यरात्री खाद्याची ऑर्डर जास्त येते ती इंदूरमधून.

आंध्र प्रदेशच्या विजयवाडा इथून झोमॅटोवर सर्वात जास्त ब्रेकफास्ट मागवला जातो. प्रत्येक ऑर्डरमागे जास्त बिल देणारं शहर म्हणजे उटी.

VIDEO: औरंगाबादमध्ये विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचा अर्धनग्न मोर्चा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 26, 2019 04:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...