खूशखबर, बजेटनंतर सोन्या-चांदीचे भाव स्थिरावले, जाणून घ्या आजचा दर

खूशखबर, बजेटनंतर सोन्या-चांदीचे भाव स्थिरावले, जाणून घ्या आजचा दर

Gold Price , Budget - सोन्याच्या दरामध्ये गेले दोन दिवस खूप वाढ होत होती. पण आता सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळेल

  • Share this:

मुंबई, 8 जुलै : बजेटमध्ये सोन्याच्या आयातीवरचे दर वाढण्याची घोषणा झालीय. तेव्हापासून दोन दिवस सोन्याच्या भावात वाढ झाल्यानंतर आता सोमवारी ( 8 जुलै ) सोनं 35470 रुपये प्रति 10 ग्रॅम राहिलंय. बजेटमध्ये सरकारनं सोनं आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या सीमा शुल्कात 10 टक्क्यांवरून 12.5 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला. शनिवारी सोन्यात 670 रुपयांनी वाढ होऊन 35,470 रुपये प्रति 10 ग्रॅमवर सोनं पोचलं.  बजेटच्या दिवशी सोनं 590 रुपयांनी वाढलं होतं. शनिवारी चांदीत 300 रुपयांनी वृद्धी होऊन 38,800 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.

आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयाॅर्कमध्ये सोनं 1,403.59 डाॅलर प्रति औंसवर होतं. चांदीत वृद्धी होऊन 15.05 डाॅलर प्रति औंस होती.

माझगाव डाॅकमध्ये 366 व्हेकन्सी, 8वी-10वी पास असलेल्यांनी 'असा' करा अर्ज

नाणं 1 हजार रुपये प्रति शेकडा वाढलं

दिल्ली सराफा बाजारात सोनं 99.9 आणि 99.5 टक्के शुद्ध क्रमश: 35,470 रुपये आणि 35,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

दरम्यान, चांदीत 148 रुपयांनी वृद्धी होऊन 38,948 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोचलीय. साप्ताहिक डिलिवरी भाव 808 रुपयांच्या लाभानं 38,093 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय. चांदीच्या नाण्यांना चांगली मागणी आहे.

अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात हाहाकार, सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला!

देशात गेल्या तीन वर्षांत 982 टन सोनं आयात करण्यात आलं. यात 2017-18 मध्ये 955 टन, 2016-17 मध्ये 778 आणि 2015-16 मध्ये 968 टन सोनं आयात करण्यात आलं होतं. सोन्याच्या आयातीनं चालू खात्यात वित्तिय तूट येण्यावर मर्यादा येण्यास मदत होते.

ONGC च्या नाॅन एक्झिक्युटिव्ह पदांसाठी असं डाऊनलोड करा अ‍ॅडमिट कार्ड

भारत जगातील सर्वात मोठा सोनं आयात करणारा देश आहे. यात सोन्याचा वापर दागिण्यांसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. गेल्या आर्थिक वर्षात दागिन्यांच्या निर्यातीत घट झाली. बजेटच्या दिवशी स्थानिक सराफ बाजारात सोन्याचा भाव 590 रुपयांनी वाढला होता. दहा ग्रॅंम सोनं 34 हजार 800 रुपये किंमतीवर बाजार बंद झाला होता. सोन्याच्या भावात झालेली वाढ 2019-20च्या बजेटमध्ये सोनं आणि इतर धातूंवर वाढवण्यात आलेल्या आयात शुल्कानंतर झाली.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची EVM बद्दल प्रतिक्रिया

First published: July 8, 2019, 6:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading